Autistic Pride Day 2024 Sakal
आरोग्य

Autistic Pride Day 2024 : गरोदरपणात महिलांनी 'या' गोष्टी लक्षात ठेवाव्या, अन्यथा मुलांना होऊ शकतो 'ऑटिझम'

Autistic Pride Day 2024 : ऑटिझम हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असून याबद्दल अधिक माहिती जाणूव घेऊया.

पुजा बोनकिले

Autistic Pride Day 2024 : दरवर्षी १८ जून हा दिवस ऑटिस्टिक प्राईड डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे या आजाराविषयी समाजात जनजागृती करणे हा आहे. मूल जेव्हा मोठे होते, तेव्हा त्याचा विकासही त्यासोबतच चालू असतो. उदाहरणार्थ, 6 महिन्यांचे बाळ हसायला लागते किंवा बरीच मुले लवकरच चालायला लागतात.

पण जर तुमचं मूल या गोष्टी लवकर करू शकत नसेल तर याकडे दुलक्ष करू नका. मुलांना ऑटिझम हा आजार असू शकतो. भारतातील सुमारे एक कोटी मुले या विकाराने त्रस्त आहेत. त्याची लक्षणे काय आहे आणि गर्भावती महिलांनी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

ऑटिझम ही एक समस्या आहे. ऑटिझमची सुरुवातीची लक्षणे 1-3 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये दिसून येतात. ऑटिझम म्हणजे बर्फी चित्रपटातील प्रियांका चोप्रा आणि माय नेम इज खान मधील शाहरुख खान यांना होती.

ऑटिझम म्हणजे काय?

ऑटिझम हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे. यामध्ये इतर लोकांशी संवाद साधताना अडथळा येतो. प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळी लक्षणे असतात. काही मुलं खूप हुशार असतात. काहींना शिकण्यात आणि समजण्यातही अडचण येते. ही मुले पुन्हा पुन्हा तशीच वागतात. तज्ञांच्या मते संसर्ग, गर्भधारणेदरम्यान आईचा आहार आणि आनुवंशिकता ही कारणे असू शकतात.

गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी

गर्भवती महिलांनी अल्कोहोल आणि मद्यपान करणे टाळावे. कारण यामुळे गर्भावर नकारात्क परिणाम होऊ शकतात.

ईएनटी व्यतिरिक्त मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, न्यूरोलॉजिस्ट, स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्टची मदत घ्यावी.

गर्भवती महिलांना आहारात पालेभाज्या, फळ, कंदमुळ,सुकामेवा यासारख्या पदार्थांचा समावेश करावा.

इतर गोष्टीही ठेवा लक्षात

ऑटिस्टिक मुलांना गोष्टी हळूहळू समजतात. अशावेळी आधी त्यांना समजावून सांगा आणि मग कसे बोलावे ते शिकवा.

ऑटिस्टिक मुले सामाजिक वर्तुळात बाहेर जाण्याबद्दल घाबरतात, परंतु निश्चितपणे त्यांना बाहेरगावी घेऊन जातात.

ऑटिस्टिक मुलांशी बोला आणि त्यांना चर्चेचा भाग बनवा.

खेळून त्यांना नवीन शब्द शिकवण्याचा प्रयत्न करा. मुलांना तणावापासून शक्यतो दूर ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Polluted Yamuna : यमुनेतील 'डुबकी भोवली'...नदीत आंघोळीनंतर भाजप नेत्याची तब्येत बिघडली; रुग्णालयात केलं दाखल

Elon Musk Wikipedia : आता पुरे झालं! विकिपीडियाला देणग्या देणं बंद करा; असं का म्हणाले इलॉन मस्क,नेमकं प्रकरण काय?

सर्जामधील बॅकलेस सीन शूट करताना घाबरलेली दिग्गज अभिनेत्री ; "दत्ता काकांनी मला अचानक सांगितलं..."

Latest Maharashtra News Updates : भाजप मुंबईत १८ जागा लढवणार

WTC 2025: भारतानं मालिका तर हरलीच, पण Points Table मधील अव्वल नंबरही धोक्यात; न्यूझीलंड आता कोणत्या स्थानी?

SCROLL FOR NEXT