Diet Food sakal
आरोग्य

आहार‘मूल्य’ : श्रावण आणि आहार

श्रावण महिना म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर निरनिराळे सण दिसू लागतात. सगळीकडे नवचैतन्य, हिरवळ ओसंडून वाहत असतं. पूर्वीच्या काळी माहेरवाशिणी घरी येत असत.

सकाळ वृत्तसेवा

- अवंती दामले, आहारतज्ज्ञ आणि सल्लागार

श्रावण महिना म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर निरनिराळे सण दिसू लागतात. सगळीकडे नवचैतन्य, हिरवळ ओसंडून वाहत असतं. पूर्वीच्या काळी माहेरवाशिणी घरी येत असत. मिळून मिसळून निर्सगाशी एकरूप होऊन वेगवेगळे सण साजरे केले जात. आज आपण आहारशास्त्राच्या दृष्टीनं सणांचं महत्त्व बघू या.

श्रावणी सोमवार : या दिवशी दिवसभर उपवास करून तो संध्याकाळी लवकर सोडण्याची पद्धत आहे.

उपवासाचे फायदे

  • उपवासामुळे शरीराची शुद्धी करण्याची (डिटॉक्सिफिकेशन) प्रक्रिया सुधारते.

  • सुज कमी होण्यास मदत होते. रक्तातील शर्करेला मर्यादित राखण्यास मदत होते.

सोप्या टिप्स

  • आहारात दूध, दही, ताक, पनीर यासारखे पदार्थ घ्यावेत.

  • फळे, काकड्या, रताळी, सुरण यासारख्या पदार्थांचा समावेश करावा.

  • साखर, साबुदाणा, तळलेले, मीठ लावलेले पदार्थ टाळावेत.

  • पाण्याचे प्रमाण योग्य राखावे.

नागपंचमी

या दिवशी वाफवलेले, उकडलेले, भाजलेले खाण्याचा प्रघात आहे. स्वयंपाकाच्या या वेगवेगळ्या कृतींमुळे वेगवेगळ्या चवींबरोबरच मर्यादित उष्मांक मिळण्यास मदत होते. या सर्व कृतींमध्ये पदार्थ वाफेवर शिजवले जातात. त्यामुळे त्यातील गुणधर्म वाढीस लागतात.

श्रावणी शुक्रवार, मंगळागौर

या दोन्ही दिवशी फुटाणे, चणे, मोड आलेली मटकी, मिश्र पिठांचे भाजणीचे वडे असे पदार्थ खाल्ले जातात. त्यातून वनस्पतीज प्रथिने मिळण्यास मदत होते. आणि आहारात मोड आलेली कड‌धान्ये वापरून त्याचे पदार्थ केल्याने पोषण व त्यांचे योग्य प्रकारे शोषण व पचन होण्यास मदत होते. वेगवेगळ्या खेळांमुळेही हॅप्पी हार्मोन्सची निर्मिती तर होतेच; पण त्याचबरोबर स्नायूंची ताकद, लवचिकता वाढण्यासही मदत होते.

नारळी पौर्णिमा

या दिवशी आहारामध्ये ओल्या नारळाचे सेवन केले जाते. ओल्या नारळात चोथा असतो. त्यामुळे रक्तातील साखर संतुलीत राहण्यास मदत होते. त्याचबरोबर अॅंटिऑक्सिडंट्समुळे कॅन्सरसारख्या रोगाला लांब ठेवण्यास मदत होते. मलावरोध दूर होतो. शरीराला आवश्यक असे फॅट मिळण्यास मदत होते.

गोपाळकाला

गोपाळकाला हे अन्नातील विविधतेचे उत्तम असे उदाहरण आहे. आहारामध्ये चोथा, जीवनसत्त्वे, क्षार, फायटोकेमिकल्स, अँटिऑक्सिडंट्स इत्यादींच्या मिश्रणामुळे आतड्यांचे आरोग्य उत्तम प्रकारे राखता येते. त्यांचे शोषण चांगल्या प्रकारे होऊन शरीराचे पोषण होण्यास मदत होते.

श्रावणासाठीचे काही सोपे बदल

१. आहारामध्ये विविध भाज्या व फळांचा समावेश करावा.

२. आहार बनवताना स्वयंपाकातील वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करावा. उदा. वाफवणे, भाजणे, उकडणे, उकळणे इ.

३. तळलेले, मीठयुक्त, साखरयुक्त पदार्थाचा वापर करावा.

४. रोजचे पदार्थ करताना गूळ, काकवी, मध इत्यादींचा वापर साखरेऐवजी करावा.

५. पाण्याचे प्रमाण राखावे. पाण्याबरोबरच ताक, लिंबूपाणी, कढी, सूप इत्यादी पदार्थांचा वापर करावा.

६. व्रतवैकल्ये करताना ध्यानावर भर द्यावा.

७. चालणे, फिरणे, धावणे इत्यादींबरोबरच वेगवेगळ्या शारीरिक कवायती व खेळ यांचा समावेश करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT