- अवंती दामले, आहारतज्ज्ञ आणि सल्लागार
नवीन इंग्रजी वर्षाची सुरवात करताना आज आपण बारा सुपरफूड्सचा विचार करूया. जेव्हा आपण आहारातील बदलांचा विचार करतो, तेव्हा त्या पदार्थाचा समावेश रोजच्या आहारात केल्यास आरोग्य चांगल्या प्रकारे राखण्यास मदत होईल.
१) कडधान्यं
कडधान्यं ही वनस्पतीजन्य प्रथिनांमध्ये गणली जातात. त्यापूसन कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम, क्रोमियम इत्यादी क्षार मिळण्यास मदत होते. यांच्या वापरामुळे रक्तातील शर्करा मर्यादित राखण्यास मदत होते, रक्तदाब नियंत्रित होतो. चोथा मिळण्यास मदत होते.
२) अळंबी किंवा मश्रूम
या भाजीपासून क्रोमियम, झिंक, मॅग्नेशियम, सेलेनियमसारखे क्षार मिळतात. रक्तातील शर्करा संतुलित राखण्यासाठी, चोथा मिळण्यासाठी अँटिऑक्सिडंट्स मिळण्यासाठी उपयुक्त.
३) गाजरं
उत्तम जीवनसत्त्व अ, क असणारी भाजी. डोळ्यांच्या आरोग्यासाठी, उत्तम त्वचेसाठी उपयुक्त, चोथायुक्त, अँटिऑक्सिडंट्सनी युक्त.
४) काकडी
पाण्याचा स्रोत, जीवनसत्त्व क, ब यांचा समावेश, कोलॅजेन शरीरामध्ये तयार करण्यासाठी उपयुक्त. अँटिऑक्सिडंट्स व डिहायड्रेशन कमी करण्यासाठी उपयुक्त.
५) नारळ (ओला)
चोथायुक्त, एमसीटी हे शरीरासाठी उपयुक्त फॅट्स मिळतात. पोट भरल्याची भावना वाढवण्यासाठी उपयुक्त. पदार्थांचा ग्लायसेनिक इंडेक्स कमी करतो.
६) लिंबू, आवळा
या फळांपासून जीवनसत्त्व क मिळते. अँटिऑक्सिडंट्सयुक्त. लोहाचं शोषण वाढवण्यासाठी उपयुक्त. केसगळती थांबवतात.
७) नाचणी
मिलेट्स धान्य असून लोह, चोथा, झिंक, मॅग्नेशियम, सेलेनियम इत्यादी क्षार मिळण्यास मदत होते. रक्तदाब व रक्तातील शर्करा संतुलीत राहण्यास मदतरूप ठरते.
८) चिया सीड्स
पोट साफ होण्यासाठी मदतरूप. रक्तातील शर्करा संतुलीत राहते. पोट बऱ्याच वेळासाठी भरलेले राहते.
९) लसूण
रोगप्रतिबंधक शक्ती वाढवण्यासाठी, रक्तदाब संतुलनासाठी, रक्तातील शर्करा योग्य प्रकारे मर्यादित राखण्यासाठी उपयुक्त. सूज कमी करण्यासाठी आणि वेदनाशामक म्हणून उपयुक्त.
१०) रताळे
स्टार्चयुक्त, चोथायुक्त, योग्य प्रमाणात उष्मांक मिळण्यासाठी, जीवनसत्त्व अ, कयुक्त. लोह, सेलेनियम, झिंक, पोटॅशियम व क्षारयुक्त.
११) बदाम
जीवनसत्त्व ‘ई’युक्त. उत्तम फॅट्स मिळण्यासाठी, प्रथिनांसाठी उपयोगी. आतड्याच्या आरोग्यासाठी, केसांच्या आरोग्यासाठी, त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त.
१२) दही/ ताक
कॅल्शियम व प्रथिनांचा स्रोत. आतड्याच्या आरोग्यासाठी उपयुक्त, पचनासाठी उपयुक्त. नैसर्गिक प्रोबायोटिक म्हणून उपयुक्त.
या बारा पदार्थांचा वापर आपण दैनंदिन जीवनात केल्यास आपली रोगप्रतिबंधक शक्ती वाढण्यास मदत होते, स्नायूंची वाढ होते व चरबीचे प्रमाण कमी होते. रक्तदाब व रक्तातील शर्करा संतुलित राखण्यास मदत होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.