avoid overeating diwali faral rich protein food diet health Sakal
आरोग्य

Overeating : जास्त प्रमाणात खाणे टाळा

दिवाळीचा फराळ हा आपण शक्यतो स्नॅक म्हणून खातो म्हणजेच सकाळी ११ वाजता किंवा संध्याकाळी चार पाच वाजता.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. कोमल बोरसे

आपण गेल्या भागात दिवाळीतील पदार्थांची माहिती घेतली. दिवाळीतले पदार्थ तळलेले आणि गोड असतात. त्यामुळे आहारामध्ये खालील गोष्टींचा वापर वाढवा जेणेकरून तुमचा आहाराचा समतोल राखला जाईल.

दिवाळीचा फराळ हा आपण शक्यतो स्नॅक म्हणून खातो म्हणजेच सकाळी ११ वाजता किंवा संध्याकाळी चार पाच वाजता. तर तुम्ही तुमच्या दिवसाची अन्य जेवणे आहेत म्हणजेच नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण हे प्रोटिन-रिच ठेवा.

म्हणजे ताटामध्ये दुधाचे पदार्थ जसे की पनीर, दही, कडधान्य, डाळी, सोयाबीनचे पदार्थ किंवा मग मांसाहार करत असाल तर अंडी, चिकन हे सगळे पदार्थ तुमची ऊर्जा दीर्घकाळ राखून ठेवतात आणि तुम्हाला वारंवार खायची इच्छा होणार नाही.

एकाच वेळी खूप जास्त पदार्थ खाऊ नका. ही सवय तुमच्या पचन प्रक्रियेवर परिणाम करते. शिवाय यामुळे झोपेचं प्रमाणही वाढतं आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.

त्यामुळे असा धोका टाळण्यासाठी दिवसातून पाच-सहा वेळा थोड्या-थोड्या वेळाच्या अंतराने पोषक अन्न पदार्थ खा. असे केल्यास तुमची पचन प्रक्रिया (चयापचन) सुरळीत राहून, तुमचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

पालेभाज्यांचे प्रमाण वाढवा. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये न विसरता सॅलड घ्या आणि दोन्ही जेवणांमध्ये पालेभाज्यांचा वापर करा. फायबर हे तुम्हाला पचनासाठी मदत करेल आणि फॅट लॉससाठी मदत करेल आणि भूक भागवायचे काम करते.

सध्या खूप छान फळे येत असल्याने दिवसातून एक-दोन फळे नक्की खा. संत्री, मोसंबी, सीताफळे, ड्रॅगन फ्रूट, पेरू या फळांची एक फोड फराळ करण्यापूर्वी खा. म्हणजे तुमचा फराळावर ताबा सुटणार नाही.

रात्रीचे जेवण सातच्या आत करा. दिवसभरात खूप काही खाल्ल्यामुळे थोडे-फार फॅट वाढणारच आहे. परंतु रात्री उशिरा जेवणार असेल आणि खाऊन लगेच झोपणार असेल तर रात्रीचे जेवण हे तुमच्या फॅटमध्ये परावर्तित होईल. त्यामुळे अधिक फॅट वाढेल. त्यामुळे रात्रीचा आहार लवकर घ्या. दिवाळीबरोबर सुटीचाही मनसोक्त आनंद लुटा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दुसऱ्या फेरी अखेर माहीममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT