Ayurvedic Herbs : देशातील अनेक भागांमध्ये सध्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात ही काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळत असून, रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाळ्यात खरं तर आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. शिवाय, लहान मुले आणि वयोवृद्ध यांची रोगप्रतिकारकशक्ती या दिवसांमध्ये कमी झालेली असते. त्यामुळे, त्यांना विविध आजारांचा धोका असतो.
परंतु, तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही. जर तुम्हाला पावसाळ्यात ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवायची असेल तर आज आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक वनस्पतींबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही पावसाळ्यात ही निरोगी आणि मजबूत राहू शकता. चला तर मग जाणून घेऊयात त्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींबदद्ल.
तुळस ही औषधी वनस्पती प्रत्येकाच्या अंगणात हमखास लावलेली असते. या तुळशीमुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. आयुर्वेदामध्ये तुळशीचे अनन्यसाधारण महत्व सांगण्यात आले आहे. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी तुळस अतिशय प्रभावी आहे. तुळशीमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे ही वनस्पती संसर्गास प्रतिबंध घालण्यासाठी आणि श्वसनासाठी अतिशय फायदेशीर आहे.
आयुर्वेदामध्ये अश्वगंधा या वनस्पतीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहे. ही औषधी वनस्पती तणाव आणि चिंता या समस्या मोठ्या प्रमाणात कमी करू शकते. विशेष म्हणजे या वनस्पतीचे सेवन केल्याने थकवा आणि झोपेशी संबंधित समस्याही दूर होतात. मुख्य म्हणजे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास अश्वगंधा मदत करते.
गुळवेल ही औषधी वनस्पती आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते. या वनस्पतीचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी ही वनस्पती लाभदायी आहे. या वनस्पतीमुळे पचनक्षमता सुधारते आणि विविध संसर्गापासून संरक्षण होते.
आयुर्वेदामध्ये शंखपुष्पी या औषधी वनस्पतीचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे. या वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा आणि औषधी गुणधर्मांचा समावेश आढळून येतो. शरीराची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी शंखपुष्पी वनस्पती फायदेशीर आहे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.