Bad Habits esakal
आरोग्य

Bad Habits : तुमच्या ह्याच सवयी देतात कँसरला निमंत्रण, आजच सोडा; नाहीतर...

आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो.

धनश्री भावसार-बगाडे

How To Reduced Cancer Risk : कँसरच नाव ऐकताच अनेकांच्या अंगावर काटा येतो. हा आजार ही तसाच भयंकर आहे. वेळेत इलाज झाला नाही तर तो जीव घेतो. शरीरात कँसर फार हुळू हळू वाढतो. बऱ्याचदा त्याची लक्षणंही दिसत नाही. कँसर झाल्यावर पेशींची वाढ असामान्य पद्धतींनी होते. या पेशी इतर पेशींपर्यंत पसरतात. आणि शरीराच्या इतर अवयवांवर त्याचा परिणाम होतो.

Bad Habits

पण जर तुमची रोग प्रतिकारक शक्ती चांगली असेल तर कँसरसहित इतर आजार तुमच्या आजुबाजूला फिरकत नाहीत. आपल्या लाइफस्टाइलमधल्या काही वाईट सवयी आणि काही पर्यावरणीय कारणांनी पेशी फ्री रॅडिकल्स बनवणं सुरू करतात. फ्री रॅडिकल्समुळे कँसर होण्याची शक्यता वाढते. फ्री रॅडिकल्ससाठी धुम्रपान, मद्यपान, गुटखा या गोष्टी विशेष जबाबदार ठरतात. म्हणून या सवयी सोडून कँसरपासून वाचता येतं.

Bad Habits

धुम्रपान, तंबाकू या वाईट सवयी आहेत हे आपण सर्व जाणतो, तरीही त्या वाईट सवयी लावून घेतो. जर या वाईट सवयी सोडल्या तर कँसर, लिव्हरसहित अनेक आजारांचे धोके फार कमी होतात. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार कँसरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणात २५ ते ३० टक्के प्रमाण हे तंबाकू सेवनाचे आहे. यातील ८५ टक्के रुग्ण हे धुम्रपान करणारे असतात.

Bad Habits

मद्यपान फक्त लिव्हरवरच परिणाम नाही करत तर हे कँसरचेही कारण बनते. जास्त मद्यपान हे कोलोन लिव्हर आणि ब्रेस्ट कँसरचा धोका वाढवतात. अभ्यासानुसार महिला ३० एमएल आणि पुरुष ६० एमएलपेक्षा जास्त मद्यपान करणं नुकसानकारक ठरू शकते. म्हणून या वाईट सवयी सोडाव्या.

Bad Habits

सूर्य प्रकाश व्हिटॅमीन डी चा सर्वात मोठा स्रोत आहे. पण जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहिल्यानेही स्कीन कँसर होऊ शकतो. म्हणूनच डॉक्टरांचा सल्ला असतो की, जर तुम्हाला जास्तवेळ सूर्यप्रकाशात रहावे लागत असेल तर सनस्क्रीन लोशन नक्कीच लावावे.

Bad Habits

प्रोसेस्ड फूड , रोज बाहेरचे पिझ्झा, बर्गर, फास्ट फूड, जास्त चीझ, बटर, पॅकेट फूड खाल्ल्याने अनेक आजार होण्याचा धोका संभवतो. बऱ्याच अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की, प्रोसेस्ड फूड कँसरचा धोका वाढवतो. त्यामुळे अशा वाईट सवयी वेळीच सोडणे योग्य ठरते.

Bad Habits

एकाच जागी बसून काम करणे, इतर हालचाली न करण्याच्या वाईट सवयी तुम्हाला आजारी पाडतात. यामुळे वजन वाढतं. यामुळे डायबेटीस, हार्ट डिसीज होतात. यातूनच पुढे कँसरचे कारण ठरू शकते. अभ्यासानुसार जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर कँसरचा धोका कमी होतो. त्यामुळे सुस्त जीवनशैली सोडून अॅक्टिव्ह होणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT