Bajra Roti Benefits : थंडी सुरु झाली की आहारात हवा तो बदल करणे गरजेचे आहे. नाहीतर त्याचा आरोग्यावर थेट परिणाम होतो. तुम्ही तुमच्या जेवणातील चपाती किंवा भाकरी कधी निरखून बघितलीत का? हे दोन्ही पदार्थ तुमच्या शरीराला वेगवेगळे फायदे देतात.
मात्र तुमच्या आहारात तुम्ही चपातीऐवजी भाकरीचा समावेश करून घेतलात तर तुम्हाला फरक जाणवेल. चला तर आज आपण भाकरीचे असे फायदे जाणून घेऊयात जे कदाचित तुम्हालासुद्धा माहिती नसतील.
हिवाळ्यात का खावी भाकरी?
हिवाळ्यामध्ये आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. काहींमध्ये हृदयविकाराचा तर काहींमध्ये मधुमेहाचा धोका वाढतो. तेव्हा आहारात ऋतूनुसार बदल करणं फार महत्वाचं असतं.
हिवाळ्यात आहारात शरीराला उब देणाऱ्या पदार्थांचा समावेश असावा. यात बाजरीचं नाव अग्रेसर असतं.
बाजरीमधे असतात महत्वाचे पोषक घटक
बाजरीमधे असणारी प्रथिनं, फायबर, रोगप्रतिकार घटक, विटामिन बी ३, बी-६ आणि बी-९ अशी तत्व शरीराला फायदेशीर ठरतात. त्यामुळं ग्लुटन (Gluten) असणाऱ्या गव्हापेक्षा बाजरी कधीही उत्तम पर्याय ठरतो.
यामध्ये असणाऱ्या पोषक तत्वांमुळे रक्तपुरवठा सुरळीत होतो. शिवाय रक्तदाबही नियंत्रणात राहातो. थोडक्यात हृदयविकाराचा धोका तुमच्या कायम लांब राहातो.
फायदे
बाजरीची भाकरी आणि खिचडी खाल्ल्याने शरीराला आवश्यक ग्लुकोजचा पुरवठा होतो.
रक्तातील शुगरचं प्रमाणही नियंत्रणात राहातो. तसेच वजनही नियंत्रणात राहातं.
पचनक्रिया सुधारण्यासही मदत होते.
गव्हाच्या पिठाच्या चपातीच्या तुलनेत बाजरीची भाकरी पचायला हलकी असते.
त्यामुळे अपचनाचे त्रासही होत नाहीत.
शरीराची उत्सर्जन प्रक्रिया सुधारते.
शरीरातील नसा आकुंचन पावणं, सर्दी- थंडी भरणं या अशा समस्याही बाजरीची भाकरी दूर करते.
तेव्हा रोजच्या जेवणात चपातीऐवजी भाकरी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. (Health News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.