नांदेड : कोरोनामुळे (Corona) शाळा बंद झाल्या. त्यामुळे शाळांनी ऑनलाइन क्लासेस (Online Classes) सुरु केले. पालकांनी मुलांच्या हातात टॅब आणि स्मार्टफोन दिले. मात्र, याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. क्लासेसमुळे अल्पवयीन मुला-मुलींचा पॉर्नकडे (Internet Impact On Children) कल वाढत आहे. यासोबतच मोबाईलवर वारंवार येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे मुलांचे अश्लीलतेकडे आकर्षण वाढत आहे. त्यामुळे आता नवीनच सामाजिक समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. कोरोनामुळे ऑनलाइन क्लासेसला मंजुरी मिळाली. त्यामुळे जवळपास प्रत्येक पालकांनी मुला-मुलींना इंटरनेटच्या (Misuse Of Internet) सुविधेसह स्मार्टफोन दिले. (bad impact of internet on children during online education glp88)
ऑनलाइन क्लासेस संपल्यानंतरही स्मार्टफोन मुलांकडे राहतो. स्मार्टफोन वापरतानाच मुलांमध्ये सोशल मीडियाचे आकर्षण वाढले असून फेसबुक, इन्स्टाग्राम, यु-ट्युब (Youtube) आणि ट्विटरटीचीही (Twitter) क्रेझ आहे. मुलींमध्ये तर इन्स्टाग्रामचे एवढे फॅड आहे की, दोन दोन अकाउंटवर ॲक्टिव्ह असतात. इंस्टावर व्हिडिओ बनवून पोस्ट करायचे भारी फॅशन विशेष करून मुलींमध्ये दिसून येते. यासोबतच फेसबुक (Facebook), इंस्टावर (Instagram) अश्लील वेबसाईटच्या लिंक येत असतात. अनेक उत्स्कुतेपोटी लिंक उघडून पाहतात. या मुळे मुलांना अश्लील वेबसाइटवर सर्चिंग करायचे व्यसन लागते. घरात कुणी नसले की मुले-मुली अश्लील फोटो किंवा व्हिडिओ असलेल्या साईट्सला भेटी दत असल्याची बाब समोर आली आली.
सोशल मिडियाचा चस्का
सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ टाकून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची अनेकांना सवय असते. सुंदर फोटो काढून फेसबूक किंवा इंस्टावर अपलोड करताच येणारा लाईक्स आणि कमेंटचा पाऊस बघून सोशल मीडियाचा मुलांना चक्का लागतो. यातूच अश्लील व्हिडिओ आणि वेबसाईट बघण्याची सवय लागते.
मुलांमध्ये वाढेल हिंसक वृत्ती
अश्लील वेबसाइटवर फोटो व्हिडिओ बघितल्यास बाल मनावर विपरीत परिणाम होतात. मुला-मुलींमध्ये भिन्नलिंगी आकर्षण निर्माण होते. प्रेमाबाबत कल्पना नसतानाही मुलांना उत्सुकता निर्माण होते. यातूनच मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती निर्माण होते. त्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
मुलांचे मन अबोल असते. पालकांना लैगिंक विषयावर मुलांनी प्रश्न विचारले तर त्याचे योग्य समाधान करावे. मुले जिज्ञासेपोटी लैंगिकतेकडे वळतात. काय करावे आणि काय करु नये, याची त्यांना समज नसते. पालकांनी तारतम्य बाळगून मुलांची समजूत घालावी. सहज आणि समजेल अशा भाषेत मुलांचे प्रबोधन करावे.
- प्रा. राजा आकाश (मानसोपचारतज्ज्ञ)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.