Banana Leaf Benefits esakal
आरोग्य

Banana Leaf Benefits : वजन कमी करण्यापासून ते पचनक्षमता सुधारण्यापर्यंत, केळीच्या पानातील अन्न खाण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे

Banana Leaf Benefits : भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये केळीच्या पानांवर जेवायला वाढण्याची परंपरा फार जुनी आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Banana Leaf Benefits : भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये केळीच्या पानांवर जेवायला वाढण्याची परंपरा फार जुनी आहे. भारतात कित्येक वर्षांपासून ही परंपरा प्रचलित आहे. आज ही दक्षिण भारतात अनेकांना केळीच्या पानांवर वाढलेले जेवण खायला आवडते. त्या राज्यांमधील अनेक लोक आजतागायत ही परंपरा पाळत आहेत.

दक्षिण भारतीय लोक भांड्यांऐवजी केळीच्या पानात जेवायला देतात आणि खातात. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का? की केळीच्या पानात वाढलेल्या अन्नाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आज आपण केळीच्या पानात वाढलेल्या अन्नाचे सेवन करण्याचे कोणते फायदे आहेत? ते जाणून घेणार आहोत.

पचनक्षमता सुधारते

केळीच्या फळासोबतच केळीची पाने देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. केळीच्या पानांमध्ये पचन आणि विषाणू नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे, आपल्या शरीराची पचनक्षमता सुधारते आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

मधुमेहापासून बचाव

केळीच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. या शिवाय, केळीच्या पानांमुळे मधुमेह देखील नियंत्रित राहतो आणि त्याचा धोका ही कमी होतो. त्यामुळे, ज्या लोकांना मधुमेह आहे, त्या लोकांनी केळीच्या पानात वाढलेल्या अन्नाचे अवश्य सेवन करावे.

जीवनसत्वे आणि खनिजांचा उत्तम स्रोत

केळीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, ए यांचे विपुल प्रमाण आढळते. यासोबतच कॅल्शिअम, पोटॅशिअमसारखी पोषकतत्वे आणि खनिजे यांचे भरपूर प्रमाण आढळते. हे सर्व पोषकघटक आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जातात.

वजन कमी करण्यात करते मदत

केळीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन बी, सी आणि फायबर्सचे विपुल प्रमाण आढळते. ज्यामुळे, वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. याशिवाय, आपली भूक नियंत्रित ठेवण्यासही यामुळे मदत होऊ शकते. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, त्या लोकांनी केळीच्या पानात वाढलेल्या अन्नाचे जरूर सेवन करावे. यामुळे, त्यांना वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.     

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT