Benefits Of Quitting Sugar Skin Glow Immunity heart health Benefits Of Quitting Sugar Skin Glow Immunity heart health
आरोग्य

साखर खाणंच बंद केलं तर काय होईल? घ्या जाणून

सकाळ डिजिटल टीम

तुम्हाला कोणी साखर सोडं असं म्हटलं तर...तुम्ही नाहीच हा शब्द उच्चाराल. कारण साखर आपल्या दैनंदिन आहाराच्या सवयींचा अविभाज्य भाग आहे. चहापासून ते मिष्टान्नांपर्यंत सर्वच गोष्टींची चव छान लागते. पण तुम्हाला माहित आहे का की, साखर देखील अनेक आरोग्य समस्यांचे कारण आहे. आपण कधी विचारही केला नसेल. पण साखर सोडल्याने शरिरात अनेक बदल होतात. साखर सोडल्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा इत्यादी समस्या कमी होऊ शकतात. जर आपल्याला डायबिटिज किंवा हृदयाच्या निगडीत समस्या असतील तर, साखर खाणे टाळा असे अनेक तज्ज्ञ सांगतात. तर जाणून घेऊया साखर सोडण्याचे फायदे.

साखर टाळल्याने आरोग्य सुधारते

आहारातून साखर कमी केल्याने, फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि दुबळे प्रथिने यांसारखे पौष्टिक-दाट पदार्थ खाण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे आपल्या आरोग्यात सुधारणा होते.

वजन कमी होते

साखरेमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. गोड पदार्थ आणि शीत पेयांमध्ये भरपुर प्रमाणात साखर आढळते. त्यामध्ये पौष्टीक घटक कमी असतात. वजन कमी करण्यासाठी आपण दिवसभरामध्ये जास्त पाणी आणि कॅलरी जास्त नसलेले पेय आहारामध्ये घ्या. तसेच, रिकाम्या पोटी साखर खाल्ल्याने वजन वाढते. त्यामुळे साखर खाणे टाळा.

साखर आणि हृदय

साखरेचे सेवन अतिप्रमाणात केल्याने हृदयाला धोका निर्माण होऊ शकतो. साखरेचे जास्त सेवन केल्याने रक्तवाहिन्या हळूहळू अरुंद होतात किंवा कडक होतात, त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि हृदयविकारांचा धोका वाढतो. साखरेचे अतिसेवन केल्याने जळजळ आणि श्वासोशच्छवास घेण्यास त्रास होणे. अशा समस्यांचा सामना करावा लागतो.

दातांची समस्या

साखरेमुळे दातांमध्ये बॅक्टेरिया तयार होतात ज्यामुळे दात लवकर खराब होतात तसेच दातांमध्ये पोकळी देखील निर्माण होते. साखरेचे सेवन केल्याने तोंडामध्ये बॅक्टेरिया वाढतात ज्यामुळे तोंडातून दुर्गंधी देखील येऊ शकते. तसेच, दात पिवळे होण्याची शक्यता असते. यासोबतच अनेकदा तोंड येण्याची समस्या देखील उद्भवते.

रोगप्रतिकारकशक्ती वाढते

साखर खाणे टाळल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढते. साखर टाळली की शरीरात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. दिवसभर उत्साही आणि आनंदी, ताजेतवाने राहण्यासाठी साखर टाळणे गरजेचे आहे.

चेहऱ्याची पोत सुधारते

चेहऱ्याची पोत सुधारण्यासाठी साखर बंद करा. यामुळे टोन्ड चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते. तसेच चेहऱ्यावरची सूज किंवा चरबी कमी करण्यासाठी साखर किंवा गोडाचे पदार्थ टाळा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT