Benefits Of Sarvangasana  esakal
आरोग्य

Benefits Of Sarvangasana : मानसिक आरोग्यासोबतच उत्तम शारिरीक संतुलनासाठी फायदेशीर सर्वांगासन, जाणून घ्या सरावाची पद्धत अन् फायदे

Benefits Of Sarvangasana : सर्वांगासन हे योगासन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. या आसनात संपूर्ण शरीर खांद्यावर संतुलित केले जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits Of Sarvangasana : मानसिक आणि शारिरीक आरोग्य राखण्यासाठी योगासने हा अतिशय प्रभावी मार्ग मानला जातो. जर तुम्ही नियमित योगासनांचा सराव केला तर तुमचे मानसिक आणि शारिरीक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. अनेक आजारांचा धोका कमी करण्यासाठी आणि शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी योगा विशेष भूमिका बजावते.

योगासनांमध्ये विविध आसनांचा समावेश आढळून येतो. या आसनांपैकीच एक असलेले सर्वांगासन हे योगासन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. या आसनात संपूर्ण शरीर खांद्यावर संतुलित केले जाते.

थोडक्यात सर्वांगासन हा एक संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे, जो अनेक स्नायूंवर काम करतो. या आसनाचा नियमितपणे सराव केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. आज आपण हे योगासन करण्याची योग्य पद्धत अन् फायदे जाणून घेणार आहोत.

सर्वांगासन करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वांगासन हे योगासन इतर आसनांच्या तुलनेत करायला जरा कठीण असू शकते. त्यामुळे, हे योगासन जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर योगातज्ज्ञाची मदत अवश्य घ्या.

  • हे योगासन करताना सर्वात आधी योगा मॅटवर पाठीवर झोपा.

  • आता तुमचे दोन्ही पाय वरच्या दिशेने ९० अंशापर्यंत न्या. या स्थितीमध्ये तुमचे पाय डोक्याच्या सरळ रेषेत ठेवा.

  • हनुवटी छातीला स्पर्श करेल अशा प्रकारे तुमचे शरीर सरळ ठेवा.

  • काही काळ या स्थितीमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला शरीरात ताण जाणवेल.

  • आता हळूहळू तुमच्या सामान्य स्थितीमध्ये परत या.

सर्वांगासन योगासनाचे फायदे :

  • सर्वांगासन या योगासनाचा दररोज सराव केल्याने शरीरातील सर्व प्रमुख स्नायू सक्रिय होतात आणि रक्त परिसंचारण वाढवण्यासाठी हे योगासन फायदेशीर ठरू शकते.

  • या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने रक्ताभिसरण वाढते आणि हृदयाची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते.

  • अपचन आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हे योगासन लाभदायी आहे. त्यामुळे, या योगासनाचा दररोज सराव करा.

  • पाठीचा कणा लवचिक बनवण्यासाठी हे योगासन मदत करते.

  • सर्वांगासनाचा दररोज सराव केल्याने हात आणि खांद्याचे स्नायू मजबूत होतात. खास करून स्पोर्ट्समध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी या योगासनाचा दररोज सराव करणे फायद्याचे ठरते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT