benefits of sleep Surprising Reasons to Get More Sleep Sakal
आरोग्य

Benefits Sleep : झोपेचे फायदे

झोप तुमच्या दैनंदिन दिनक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. दर्जेदार योग्य वेळी पुरेशी झोप मिळणे अन्न आणि पाण्याइतकीच जगण्यासाठी आवश्यक आहे.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. अजय कोठारी | डॉ. सिंपल कोठारी

झोप तुमच्या दैनंदिन दिनक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. दर्जेदार योग्य वेळी पुरेशी झोप मिळणे अन्न आणि पाण्याइतकीच जगण्यासाठी आवश्यक आहे. झोपेशिवाय तुम्ही नवीन आठवणी बनवू शकत नाही. दीर्घकाळ झोप न लागणे किंवा निकृष्ट दर्जाच्या झोपेमुळे उच्च रक्तदाब हृदय व रक्तवाहिन्या संदर्भात रोग, मधुमेह, नैराश्य व लठ्ठपणा यासारख्या विकारांचा धोका वाढतो.

हायपोथालेमस ः मेंदूच्या आत खोलवर असलेली स्वना झोपेवर नियंत्रण करण्याचे काम करते. यावर परिणाम झाल्यास झोपेचे नियंत्रण बिघडते.

झोपेची यंत्रणा ः जैविक घड्याळ २४ तासांचे असून मेलाटोनिन पाईनल ग्रंथीद्वारे उत्सर्जित होणारा संप्रेरक यात महत्त्वपूर्ण काम करते. शरीराला ठरावीक वेळेनंतर झोपण्याची आठवण करून देते.

झोपेवर परिणाम करणारे घटक

  • वेगळी जागा, अंथरूण

  • वैद्यकीय आजार, औषधे, तणाव

  • आजूबाजूचे वातावरण

  • काय खाता, काय पिता

  • प्रकाशाचा संपर्क

रात्रीच्या शिफ्टमधील कामगारांना अनेकदा झोप न येण्यास त्रास होतो. कामाच्या ठिकाणी जागे राहण्यासाठी त्रास होतो. कारण त्याचे झोपेचे जागरणाचे चक्र विस्कळीत झालेले असते. लहान बाळांना दिवसात १६-१८ तासांची. शालेय वयातील मुलांना ८-१० तासाची, प्रौढांना ७-९ तासांची झोप आवश्यक असते.

झोपेच्या विकाराची लक्षणे

१) झोप न लागणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण कधी अल्प किंवा दीर्घकाळ साठीही होऊ शकते.

२) स्लिप ॲपनिया : झोपेशी संबंधित श्वसोच्छवासाचा विकार आहे. या अवस्थेत अनेकदा लोक खूप घोरतात आणि श्वास घेण्यासाठी जागे होतात. या लोकांना दिवसा झोप, सकाळी डोकेदुखी आणि कोरडे तोंड पडते.

३) नार्कोलेप्सी : हा असामान्य विकार आहे. लोकांना पुरेशी झोप मिळूनही दिवसा झोपेची इच्छा होऊ शकते. त्यामुळे झोपेचा झटका येऊ शकतो.

पुरेशी झोप मिळण्यासाठी

१) शेड्यूल सेट करा : रोज एका वेळेस झोपायला जा आणि त्याचवेळी जागे व्हा.

२) रोज व्यायाम करा : २० ते ३० मिनिटे

३) उशिरा कॅफिन, अल्कोहोल आणि निकोटीनयुक्त पदार्थ टाळा, मसालेदार जड चरबीयुक्त पदार्थ रात्रीच्या जेवणात टाळा.

४) झोपण्यापूर्वी उबदार अंघोळ, वाचन व आराम करा.

५) झोपेची खोली वेगळी ठेवा. प्रखर दिवे आणि मोठा आवाज टाळा, बेडरूममध्ये टिव्ही पाहू नका.

६) दिवसा झोपू नका. झोप नसेल येत तर थकवा येईपर्यंत दुसरे काम करा.

७) सर्व उपाययोजना करूनही झोप लागत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT