Blood Pressure Tattoo Sakal
आरोग्य

Blood Pressure Tattoo : मशीन नव्हे तर, आता हातावरील 'ई-टॅटू' सांगणार ब्लडप्रेशर

आज भारतासह जगभरात ब्लड प्रेशनच्या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Blood Pressure Tattoo : आज भारतासह जगभरात ब्लड प्रेशनच्या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत. विचित्र जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यासाठीची प्रमुख कारणं आहे. ज्या व्यक्तींना ब्लड प्रेशरची समस्या आहे अशा व्यक्तींना नियमितपणे बीपी तपासावे लागते. बीपी तपासण्यासाठी अनेकांच्या घरात डिजिटल बीपी मशीन असते. अनेकदा ही मशीन प्रवासातही घेऊन जावी लागते. त्यामुळे अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, आता घरात किंवा प्रवासादरम्यान बीपी मोजण्याचे मशीन कॅरी करण्याची गरज नसून, कोणत्याही मशीनशिवाय बीपी मोजण्याचे तंत्र शास्त्रज्ञांनी शोधून काढले असून, हातावरील ब्लड प्रेशर टॅटू अवघ्या काही सेकंदात तुमचे ब्लड प्रेशर किती आहे हे सांगणार आहे.

ब्लड प्रेशर टॅटूचा शोध

अमेरिकेतील ऑस्टिन शहरातील टेक्सास विद्यापीठ आणि टेक्सास ए अँड एम विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे विशेष टॅटू डिझाइन केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हा टॅटू 300 मिनिटांपर्यंत अचूक रक्तदाबाचे रीडिंग देऊ शकते. टेक्सास ए अँड एम विद्यापीठातील प्राध्यापक रुझबेह जाफरी यांनी याला कफ-लेस ब्‍लड प्रेशर टेक्‍नोलॉजी (Cuffless Blood Pressure technology) असे नाव दिले आहे.

नेहमी बीपी मोजण्याच्या त्रासापासून होणार सुटका

प्रोफेसर रुजबेह जाफरी आणि त्यांच्या टीमने तयार केलेल्या या ई टॅटूमुळे सारख-सारखं मशीनच्या मदतीने बीपी मोजण्याचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. या टॅटूच्या मदतीने अवघ्या काही सेकंदात तुमचे ब्लडप्रेशर नेमकं किती आहे याची माहिती मिळणार आहे. तुम्ही झोपेत असताना, जेवताना. चालताना एवढेच नव्हे तर, व्यायाम करतानाही याच्या मदतीने ब्लड प्रेशन मोजणे शक्य आहे. या ई-टॅटूमध्ये लावण्यात आलेले सेन्सर वजनाला अतिशय हलके असून, ते शरिरवर लावल्यनंतर त्याचा कोणतेही वजन जाणवत नाही.

च्युइंगमच्या टॅटूची होईल आठवण

दरम्यान, लहानपणी आपल्यापैकी अनेकांनी हातावर किंवा शरीराच्या काही भागांवर च्युइंगमचे टॅटू लावले असतील. हे टॅटू ग्राफीनपासून बनलेले असतात आणि 24 तासांनंतर ते निघून जातात. मात्र, बीपी मोजण्यासाठी तयार करण्यात आलेला टॅटू त्वचेतील विद्युत प्रवाह मोजतात ज्यामुळे बीपी किती आहे हे समजण्यास मदत होते. हा ई-टॅटू वॉटरप्रूफ असून, याचा वापर अंघोळ करतानाही सहज करता येणं शक्य आहे. वैज्ञानिक भाषेत सांगायचे झाल्यास या तंत्राला बायोइम्पेडन्स असे म्हटले जाते.

बाजारात कधी येणार ई-टॅटू ?

रुजबेह जाफरी आणि त्यांची टीम सध्या ई-टॅटूच्या दुसऱ्या पार्टवर काम करत असून, हा टॅटू साधारण पुढील 5 वर्षांत बाजारात येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unsold Player IPL Mega Auction 2025: अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, शार्दूल ठाकूर यांना फ्रँचायझींनी दाखवला 'ठेंगा'; मुंबईच्या खेळाडूचं नेमकं काय चुकलं?

IPL 2025 Auction Live: फाफ डू प्लेसिससाठी CSK-RCB आले नाहीत पुढे, तर सॅम करनला थालाच्या टीमनं स्वस्तात केलं खरेदी

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंची सारवासारव! थेट गृहमंत्री पदाची केली मागणी, म्हणाले...

MLA Siddharth Shirole : शिवाजीनगर विधानसभा नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा विकासाचा अजेंडा

Earth Axis Tilt : धक्कादायक! पृथ्वी ३१.५ इंचांनी झुकली..भारत ठरतोय कारणीभूत, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT