गेल्या काही आठवड्यांमध्ये बातम्यांद्वारे काही वैद्यकीय संज्ञा ऐकल्या असतील. त्यामध्ये ब्रेन डेड हा एक शब्द आपण अनेकवेळा ऐकला असेल. दरम्यान, राजधानी दिल्लीतील सर्वात तरुण अवयवदाता ठरलेला (16 महिने) निशांतला डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले. हा शब्द आपल्याला माहिती आहे मात्र ब्रेन डेड म्हणजे नेमके काय हे माहित नाही. यासंदर्भातील तुमच्या मनात असणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे आपण आज पाहणार आहोत. ब्रेन डेडची स्थिती काय आहे, ते मृत्यूचे सूचक आहे का? अशा काही महत्वाच्या प्रश्नांचा म्हणजे ब्रेन डेथबद्दलचा तपशीलवार समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत..
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ब्रेन डेडला वैद्यकीय भाषेत मृत्यूची कायदेशीर व्याख्या म्हणून ओळखली जाते. एखाद्याला ब्रेन डेड घोषित करणे म्हणजे त्याच्या मेंदूने सर्व प्रकारे कार्य करणे थांबवणे होय. शरीराला अगदी सिग्नल पाठवण्यापासून ते समजण्याच्या आणि बोलण्याच्या क्षमतेपर्यंत सर्व शारीरिक आणि मानसिक क्रिया मेंदूने बंद केल्या आहेत, असा होता. मेंदूच्या सर्व प्रक्रिया थांबतात आणि तो डेड म्हणून घोषित केला जातो.
ब्रेन डेड ची स्थिती नेमकी कशी असते?
मेंदूला गंभीर दुखापत झाली असेल किंवा गंभीर स्ट्रोकचा त्रास झाल असेल तर त्याचा थेट मेंदूवर परिणाम होऊ शकतो. काही शारीरिक परिस्थितीमध्ये मेंदूवर गंभीरपणे परिणाम होतो आणि मेंदूचा मृत्यू होऊ शकतो. जेव्हा डॉक्टर एखाद्याला ब्रेन डेड घोषित करतात तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, मेंदू यापुढे कोणत्याही प्रकारे कार्य करणार नाही. एखादी व्यक्ती व्हेंटिलेटरवर असेल तर हृदय, मूत्रपिंड, यकृत असे काही अवयव कृत्रिमरीत्या श्वासोच्छवासाद्वारे जिवंत ठेवता येतात. एखादी व्यक्ती व्हेंटिलेटरवर आहे आणि त्याच्या शरीराला ऑक्सिजन कृत्रिमरित्या पुरविला जात आहे तोपर्यंत हे अवयवही जिवंत राहू शकतात. हे अशा प्रकारे समजू शकते की, ब्रेन डेड म्हणजे मेंदूचा मृत्यू झाला आहे; परंतु शरीरातील काही भाग ऑक्सिजनद्वारे कृत्रिमरित्या कार्य करत आहेत.
ब्रेन डेड का होता याची कारण?
कोणत्याही अपघातात मेंदूला गंभीर दुखापत झाली असेल तर किंवा एखाद्या लहान अपघातामुळेही ब्रेन डेड होतो. याशिवाय सेरेब्रोव्हस्कुलर इजा (म्हणजे स्ट्रोक किंवा एन्युरिझम) आणि एनॉक्सिया (ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हृदयविकाराचा झटका)
ब्रेन ट्युमर
अपघाती इजा किंवा गंभीर आजारामुळे ब्रेन डेड होऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. उच्च रक्तदाबामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याची स्थितीही ब्रेन डेडचे कारण असू शकते.
ब्रेन डेडची लक्षणे?
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, एखाद्या व्यक्तीला ब्रेन डेड घोषित करण्यापूर्वी काही चाचण्यांच्या आधारे तो खरचं मृत झाला आहे का याची खात्री केली जाते. परंतु काही अटी आणि लक्षणे अशी आहेत की ती व्यक्ती ब्रेन डेड आहे असा अंदाज लावला जाऊ शकतो. डोळ्यांकडून प्रकाशाला प्रतिसाद न मिळणे. डोळ्याच्या पृष्ठभागाला स्पर्श केल्यावर डोळे न उघडणे (कॉर्नियल रिफ्लेक्स). कानात बर्फाचे पाणी ओतल्यावरही डोळे न उघडणे किंवा इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम चाचणी मेंदूची कोणतीही क्रिया दर्शवत नाही.
ब्रेन डेड झालेली व्यक्ती जिवंत होऊ शकते का?
ब्रेन डेड ही स्थिती कायमस्वरूपी असते. त्यामुळे ती बरी होऊ शकत नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. एखाद्या रुग्णाला ब्रेन डेड घोषित केल्यानंतर, अवयवदानाचा निर्णय कुटुंबाशी बोलून घेतला जातो. जेणेकरून त्या व्यक्तीचे जिवंत अवयव दुसऱ्यासाठी वापरता येतील. व्हेंटिलेटरमधून बाहेर काढल्यानंतर शरीराला ऑक्सिजन मिळणे बंद होताच, शरीराचे इतर भागही निष्क्रिय होतात आणि त्या व्यक्तीला मृत घोषित केले जाते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.