Brain Eating Amoeba esakal
आरोग्य

Brain Eating Amoeba : मेंदू खाणारा अमिबा शरीरात जात प्राणघातक कसा होतो?

सकाळ ऑनलाईन टीम

Brain Eating Amoeba : दक्षिण कोरियामध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबा संसर्गाचे प्रकरण समोर आले आहे . कोरिया टाईम्सच्या अहवालानुसार, नेग्लेरिया फॉलेरी नावाच्या अमिबाची लागण झाल्याने एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. रुग्णामध्ये लक्षणे दिसू लागल्यानंतर 10 दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. 

कोरियाची आरोग्य एजन्सी KDCA म्हणते की रुग्ण 10 डिसेंबर रोजी थायलंडच्या सहलीवरून परतला होता. त्यानंतर त्याच्यामध्ये संसर्गाची लक्षणे दिसून आली.एजन्सीच्या म्हणण्यानुसार, रुग्णाला डोकेदुखी, उलट्या, शरीरात जडपणा आणि बोलण्यात अडचण ही लक्षणे दिसू लागल्याने आपत्कालीन स्थितीत दाखल करण्यात आले. 

21 डिसेंबर रोजी रुग्णाचा मृत्यू झाला. शरीरात या व्हायरसमुळे असे काय झाले की त्याचा मृत्यू झाला, याचा तपास सुरू आहे. नेग्लेरिया फॉलेरी म्हणजे काय आणि ते शरीरात कसे प्रवेश करते?नेग्लेरिया फॉलेरी हा अमिबा आहे. त्याला एकल पेशी सूक्ष्मजीव म्हणतात. नेग्लेरिया फॉलेरीला मेंदू खाणारा अमिबा म्हणूनही ओळखले जाते. (Health)

यूएस हेल्थ एजन्सी सीडीसीनुसार, हा सूक्ष्मजीव नदी, तलाव आणि तलावाच्या स्वच्छ पाण्यात आढळतो. जगातील याची पहिली केस 1965 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये आली होती.Naegleria fowleri नाकातून मानवी शरीरात पोहोचते. येथून ते मेंदूपर्यंत पोहोचते. अशी प्रकरणे विशेषत: जेव्हा एखादी व्यक्ती पोहते, पाण्यात वेळ घालवते किंवा डुबकी मारते तेव्हा येते. 

काही प्रकरणांमध्ये तर दूषित पाण्याने नाक साफ करतानाही ते शरीरात पोहोचल्याचेही समोर आले आहे. संसर्ग झाल्यानंतर हा अमिबा मेंदूपर्यंत पोहोचतो. मेंदूच्या काही भागांना नुकसान पोहोचवण्याचे काम करते. 

इथून रुग्णाची प्रकृती इतकी बिघडते की त्याला वाचवणे कठीण होते.लक्षणे काय आहेत आणि हा रोग किती धोकादायक आहे?CDC नुसार , त्याची लक्षणे संसर्गानंतर एक ते 12 दिवसात दिसू लागतात. संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्याची लक्षणे मेंदुज्वरासारखी दिसतात. 

यात डोकेदुखी, उलट्या आणि ताप यासारखी लक्षणे दिसतात. रोग गंभीर असल्यास, मानेमध्ये ताठरता, अपस्माराचे झटके येऊ शकतात. याशिवाय रुग्ण कोमातही जाऊ शकतो.CDC नुसार, असे दिसून आले आहे की जर संसर्ग वेगाने पसरला तर सरासरी 5 दिवसात रुग्णाचा मृत्यू होतो.

 1962 ते 2021 पर्यंत अमेरिकेत 154 प्रकरणे नोंदवली गेली. यापैकी केवळ 4 रुग्ण जगू शकले.हा एक दुर्मिळ संसर्ग आहे. आजपर्यंत त्यावर नेमका उपचार सापडलेला नाही. तथापि, काही औषधांच्या मदतीने, रुग्णाची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात. 

रुग्णाला Azithromycin, Dexamethasone, Fluconazole, Rifampin, Miltefosine सारखी औषधे दिली जातात.हवामान बदल किती जबाबदार आहेत?CCD नुसार, हवामान बदलामुळे जगाचे तापमान वाढत आहे. तापमानाचा परिणाम पाण्यावरही दिसून येतो. नेग्लेरिया फॉलेरी सूक्ष्मजंतू विशेषतः स्वच्छ आणि उबदार पाण्यात आढळतात. त्यामुळे हवामान बदलामुळे अशा जीवजंतूंपासून संसर्ग होण्याचा धोका वाढत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lakshman Hake: लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा आरोप! पुण्यात हाके-मराठा आंदोलकांमध्ये वाद

Western Railway Block: मंगळवारीही पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना तारेवरची कसरत होणार, अनेक गाड्या रद्द

Dalit Student IIT Admission: सरन्यायाधिशांनी वापरला विशेषाधिकार अन् गरीब दलित विद्यार्थ्याला मिळाला IITत प्रवेश

Chhatrapati Sambhajinagar: फुलंब्रीच्या जागेसाठी ठाकरे गट महाविकास आघाडीतच भिडणार.!

IND vs BAN: कानपूर कसोटी सुरू असतानाच टीम इंडियातून ३ खेळाडू झाले बाहेर, BCCI ने कारणही केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT