आजकाल प्रत्येकाच्या हातात एक खेळणं आहे. त्यामध्ये चार-पाच प्लॅटफॉर्म वरती सोशल मीडिया अकाउंट असतात. काही लोक काम करत असताना, रिकामे असताना रील पहात बसतात. या रील्स पाहण्यात आपला किती वेळ निघून जातोय याचा अंदाज त्यांना नसतो. कारण प्रत्येकाला रील्सचा ब्रेन रॉट झाला आहे.
हा शब्द तुमच्यासाठी नवीन असेल पण या आजाराने ग्रस्त रुग्ण तुम्हाला पावलोपावली दिसतील. असे रुग्ण तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नाही तर टॉयलेटमध्ये, जेवणाच्या टेबलावर, मित्रांच्या कट्ट्यावर, ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये दिसतात.
ब्रेन रॉट ही आपल्या मेंदूची एक अवस्था आहे. ब्रेन रॉट ग्रस्त रुग्ण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रील मधील डायलॉग सतत म्हणत असतात. यामध्ये चीन टपाक डम डम, कल्लू कालिया, आप्पाचा विषय लय हार्ड आहे, असे डायलॉग सतत बडबडत असतात. त्यांच्या रोजच्या वाक्यांमध्ये ते डायलॉग घुसवून बोलत असतात. ही सवय लोकांच्या विचारांनाही प्रेरित करते. या आजाराबद्दल अधिक जाणून घेऊयात.
ब्रेन रॉट ही एक मेंदूच्या अवस्थेत आपण जाणून घेतलं. या अवस्थेबद्दल तज्ञ सांगतात की जेव्हा एखादा व्यक्ती सतत सोशल मीडियावरील कंटेंट पाहत असतो. तेव्हा तो सतत त्याच कंटेंटचा विचार करत असतो. आणि त्यामुळे व्यक्ती आपल्या मानसिक विकाराला बळी पडून आपल्या बुद्धीची विचार करण्याची क्षमता गमावतो. इथपर्यंतच मर्यादित नाही तर असा व्यक्ती मानसिक रित्या थकलेले असतात.
आजकाल मुलांमध्ये खेळण्यांपेक्षा मोबाईल घेण्याचे फॅड जास्त आहे. कारण पालकही मूल शांत बसतं म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देतात. पण जेव्हा तुमचं मुलं एक तासभर मोबाईल पाहत असतो. जेव्हा तुम्ही त्याच्याकडून तो काढून घेता तेव्हा तो अग्रेसिव्ह होतो. तो रडतो, आदळाआपट करतो, किंवा एखाद्याला मारहाण करायला जातो. हेच आहे ब्रेन रॉट.
मेंदूशी संबंधित विकार वाढण्यात आपण स्वतः कारणीभूत आहोत. मोबाईलचा वाढता वापर त्याच्यावर डिजिटल कंटेंट याचा थेट आपल्या मेंदू वरती परिणाम होत आहे. त्यामुळे अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांवरच मोबाईलचा आपल्या मेंदू वरती वाईट परिणाम होत आहे. सतत रील्स पाहण्याची सवय आपल्या मेंदूला ब्रेन रॉट या अवस्थेत बदलत आहेत.
एखाद्या व्यक्ती बोलत असताना, एखाद्या विषयावरील सेमिनार ऐकत असताना तुम्हाला जर एकाग्रपणे ऐकावेसे वाटत नसेल. किंवा तुम्ही काहीतरी वाचत असताना, नामस्मरण करत असताना सतत फोन तपासत असाल, किंवा इतर काम करतानाही फोनचा विचार करत असाल तर समजून जा की तुमची एकाग्रता कमी झाली आहे आणि याचे कारण तुमचे मोबाईल असू शकते.
जास्त स्क्रीन टाइममुळे, व्यक्ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकल्यासारखे वाटते.
रील्स पाहण्याच्या या सवयींमुळे माणसाच्या स्मरणशक्तीवरही परिणाम होतो, लोकांना छोट्या छोट्या गोष्टी विसरण्याची सवय लागते.
ब्रेन रॉट असलेल्या लोकांमध्ये सतत अस्वस्थता दिसून येते. असे लोक सतत अस्वस्थ असतात.
तुम्ही बॉडी डिटॉक्स हा प्रकार ऐकला असेल. त्याचप्रकारे डिजिटल डिटॉक्स हा प्रकारही उदयास आला आहे. वेळोवेळी डिजिटल वस्तू जसे स्मार्टफोन, हेडफोन, स्मार्टवॉच, टॅबलेट यांच्यापासून स्वतःला दूर ठेवा. या वस्तू दूर ठेवल्याने तुमचा मेंदू डिटॉक्स होऊ शकतो.
सकाळी अंथरूणात लोळून रिल्स पाहणारे अनेक लोक आहेत. तर, फार कमी लोक सकाळी व्यायामाला वेळ देतात. तुम्हालाही रील्स वेडे व्हायचे नसेल तर तुम्हीही सकाळच्या व्यायामाची सवय लावून घ्या.
रात्रीच्यावेळी मोबाईल तोंडावर पडला की मग आठवत आपल्याला झोप आलीय. इतकं मोबाईलने आपल्याला वेडं केलं आहे. त्यामुळे, पुरेशी आणि गाढ झोप घेतल्याने मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्यामुळे पुरेशी झोप घ्या.
चित्रकला, संगीत किंवा अभ्यास यासारख्या गोष्टींमध्ये व्यस्त रहा, ज्यामुळे तुमची क्रिएटिव्हीटी वाढेल.
सर्व ध्यान मोबाईलमध्ये असल्यामुळे लोक ध्यान आणि मेडिटेशनकडे लक्ष देत नाहीत. लक्ष केंद्रित करा, यामुळे मानसिक शांतता राखण्यास मदत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.