Breast Cancer esakal
आरोग्य

Breast Cancer: एकदा बरे झाल्यावर पुन्हा ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका; डॉक्टरांना 'हे' ६ प्रश्न विचारायला विसरू नका!

मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी याबद्दल मार्गदर्शनकेलं आहे.

वैष्णवी कारंजकर

Breast cancer awareness: महिलांमध्ये गेल्या काही वर्षांपासून ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसत आहे. फक्त नवे रुग्णच नाही तर एकदा कॅन्सर झालेल्या रुग्णांना तो पुन्हा होण्याचा धोकाही गेल्या ५ वर्षांमध्ये वाढला आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांना पुन्हा एकदा कॅन्सरचा सामना करावा लागला आहे.

विशेषतः शहरी भागामध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये हळूहळू वाढ होत आहे. रुग्णांना उपलब्ध उपचारांची माहिती असणं आणि त्यांच्या पर्यायांबद्दल डॉक्टरांशी खुलेपणाने चर्चा करणं महत्त्वाचं आहे.

पण कोणते मुद्दे डॉक्टरांकडून जाणून घ्यायचे? कोणत्या गोष्टी तुम्ही डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलायला हव्यात. मुंबईतल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ सुदीप गुप्ता यांनी याविषयी मार्गदर्शन केलं आहे....जाणून घ्या.

1. माझ्या स्तनाचा कर्करोग कोणत्या टप्प्यात आहे ?

योग्य उपचार योजना ठरवण्यासाठी तुमच्या स्तनाच्या कर्करोगाचा टप्पा समजून घेणं महत्त्वाचं आहे. तुमच्या डॉक्टरांना ट्यूमरचा आकार, तो जवळपासच्या लिम्फ नोड्समध्ये किंवा शरीराच्या इतर भागांमध्ये पसरला आहे का, आणि त्याचे परिणाम यासह स्पष्ट शब्दांत सांगायला लावा.

स्टेज कळली तर तुम्ही स्थितीची तीव्रता, पुनरावृत्ती होण्याची शक्यता आणि उपलब्ध उपचार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता.

2. उपलब्ध उपचार कोणते आहेत?

स्तनाच्या कर्करोगासाठी उपलब्ध असलेल्या उपचारांबद्दल चौकशी करा. प्रत्येक उपचाराचे फायदे, जोखीम आणि संभाव्य साइड इफेक्ट्स स्पष्ट करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांना सांगा.

याव्यतिरिक्त, केमोथेरपीच्या पलीकडे असलेल्या कोणत्याही प्रगत उपचारांबद्दल चौकशी करा. असेही काही उपचार असतील, ज्यामुळे तुमचा कॅन्सर परत येणार नाही.

3. पुनरावृत्ती होण्याचा धोका काय आहे आणि ते कोणत्या प्रकारचे पुनरावृत्ती असू शकते?

तुम्हाला स्तनाचा कर्करोग कोणत्या टप्प्यावर आहे यावर आधारित पुनरावृत्तीचा धोका समजून घेणं महत्त्वाचं आहे. पुनरावृत्ती ही हाडे, यकृत किंवा फुफ्फुस यासारख्या शरीराच्या इतर भागांमध्ये असू शकते.

स्तनाच्या कर्करोगाच्या प्रकार आणि टप्प्यावर अवलंबून धोका बदलू शकतो - ही माहिती समजून घेतल्याने पुढील चर्चेसाठी मार्गदर्शन करण्यात मदत होईल.

4. शिफारस केलेले उपचार माझ्या जीवनाची गुणवत्ता राखतील/सुधारतील का?

तुमच्या जीवनाच्या गुणवत्तेवर उपचारांच्या प्रभावाची चर्चा करणं आवश्यक आहे. तुमच्या डॉक्टरांना विचारा की शिफारस केलेल्या उपचारांचा तुमच्या दैनंदिन गोष्टींवर, शारीरिक आरोग्यावर, भावनिक आरोग्यावर आणि जीवनाच्या एकूण गुणवत्तेवर कसा परिणाम होऊ शकतो.साईड इफेक्ट्स आणि बदलांसंदर्भातही विचारून घ्या.

5. शारिरीक मानसिक मदत व्हावी अशा काही सुविधा उपलब्ध आहेत का?

स्तनाच्या कर्करोगाचा सामना करणे शारीरिक आणि भावनिक गरज वाढवणारं असू शकतं. तुमच्या हेल्थकेअर सुविधेद्वारे ऑफर केलेल्या सहाय्यक काळजी सेवांबद्दल चौकशी करा.

यामध्ये ऑन्कोलॉजी नर्स, सामाजिक कार्यकर्ते, मानसशास्त्रज्ञ, पोषणतज्ञ अशा अनेकांचा समावेश असतो.

6. दीर्घकालीन परिणाम आणि पुढच्या आयुष्यावर होणारे परिणाम कोणते?

तुमच्या स्तनाच्या कर्करोगाचे दीर्घकालीन परिणाम आणि पुढच्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामांची तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा.

भविष्यातील पुनरावृत्ती, सतत देखरेख आणि पाठपुरावा करण्याची आवश्यकता आणि संपूर्ण आरोग्य राखण्यासाठीच्या धोरणांबद्दल विचारा. जीवनशैलीतील बदलांबद्दल विचारा, जसे की व्यायाम, आहार आणि तणाव व्यवस्थापन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT