Breastfeeding Tips Esakal
आरोग्य

Breastfeeding Tips : स्तन्यदा मातांसाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी?

स्तनपानामुळे आई व बाळा मधील नाते अधिक दृढ होते.बाळामध्ये सुरक्षिततेची भावना वाढते.

दिपाली सुसर

Breastfeeding Tips: मातेच्या दुधातील प्रतिबंधक द्रव्यांमुळे बाळाची प्रतिकारशक्ती उत्तम राहते. जंतुसंसर्ग अथवा एलर्जी पासून बाळाला संरक्षण मिळते.आईचे दूध निर्जंतुक असल्याने बाळाला जंतुसंसर्ग होत नाही.स्तनपानामुळे आई व बाळा मधील नाते अधिक दृढ होते.बाळामध्ये सुरक्षिततेची भावना वाढते.

स्तनपानामुळे बाळाचे स्नायू नीट तयार होतात. स्तनपान हे मातेच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे ठरते.स्तनपानामुळे मातेला कमीत कमी अवधीमध्ये वजन कमी करणे शक्य होते.स्तनपानामुळे स्त्रियांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण कमी होते. स्तनपानामुळे होणाऱ्या संप्रेरकाचा मधील बदलामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते.

प्रसूतीपूर्व काळात स्तनपानाविषयी अधिक माहिती घ्यावी कारण ते पालकांना तयार होण्यास आणि स्तनपानाच्या गरजांची अपेक्षा करण्यास मदत करते. लक्षात ठेवा स्तनपान हे नवीन कौशल्य शिकण्यासारखे आहे. पहिल्यांदा माता बनलेल्या स्त्रियांसाठी योग्य ज्ञान, संयम आणि पुनरावृत्तीसह नवीन कौशल्य शिकणे सोपे असते.जन्मानंतर लगेचच तुमच्या त्वचेचा बाळाशी त्वचेशी संपर्क सुरू करा आणि तुमच्या आरोग्य सेवकांच्या टीमच्या मदतीने जन्माच्या एका तासाच्या आत स्तनपान सुरू करावे.स्तनपान हा एक आयुष्यातील आनंददायी अनुभव आहे. स्तनपान करताना बाळाला योग्य स्थितीत ठेवा यामुळे ते व्यवस्थित दूध पिते आणि आईला देखील स्तनपान करताना वेदना होणार नाहीत.

बाळंतपणानंतर बाळाला त्याच पलंगावर किंवा त्याच खोलीत आईच्या जवळ ठेवावे. यामुळे बाळाची दूधासाठी मागणी वाढणे, आईला बाळाचे संकेत ओळखणे आणि बाळाला ओळखणे असे अनेक फायदे होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आई आणि बाळामध्ये मजबूत भावनिक बंध निर्माण करण्यास मदत होते. आईच दूध बाळासाठी पुरेसे आहे की नाही हे पासण्यासाठी त्याच्या लघवी आणि वजनाची मासिक तपासणी करा. बाळाने 24 तासांत कमीत कमी 6 ते 7 वेळा लघवी केली पाहिजे आणि दर महिन्याला बाळाचे वजन किमान 500 ग्रॅमने वाढले पाहिजे. यावरून बाळाला आईचे दूध पुरेसे दूध आहे हे लक्षात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

SCROLL FOR NEXT