लघुशंका करताना अनेकदा जळजळ आणि वेदना होतात. ज्याला दैनंदिन जीवनात उन्हाळी लागणे असेही म्हणतात. हा त्रास जरी अल्पावधीचा असला तरी होणारा त्रास हा मात्र अतिशय भयंकर असतो. हल्ली ही सामान्य समस्या झाली असल्याने आपण अनेकदा याकडे दुर्लक्ष करत असतो. (burning sensation while passing urine know its causes and home remedies)
ही समस्या अधिकतर तेव्हा उद्भवते जेव्हा तुम्ही लघवीला (urine) बराच वेळ धरून ठेवता आणि नंतर लघवी करता, ज्यामुळे विविध समस्या निर्माण होतात. (Health Tips in Marathi)
तुम्ही लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्यास काय होते, जाणून घ्या
1. बराच वेळ लघवी रोखून ठेवल्यामुळे युरीन पास केल्यावरही वाटत राहते की अजून युरिन येणार आहे. हि स्थिती मानसिक रुपात आपल्यालाच गोंधळात टाकणारी असते. त्यालाच आपण उन्हाळी म्हणतो ज्यामुळे चिडचिड होण्याची शक्यता वाढते.
2. जास्त वेळ लघवी रोखून ठेवल्याने, या दरम्यान स्त्रिया आणि पुरूषांना युरेथ्रा मध्ये मोठ्या प्रमाणात जळजळ होत असल्यासारखे वाटते. ज्यामुळे व्यक्तीला त्रास होतो.
3. जास्त वेळ युरिन रोखून धरल्याने पोटाजवळ दुखू लागते हे यामुळे होते कारण शरीराला ज्या अतिरिक्त पाण्याची गरज नसते ते पाणी शरीर बाहेर फेकू इच्छिते. पण ते आपण स्नायूंमार्फत रोखून धरल्याने वेदना सुरु होतात.
लघवीत जळजळ का होते?
1. शरिराला सहा-सात लीटर पाण्याची आवश्यकता असते. पण जेव्हा आपण शरिराला पुरेसे पानी पित नाही तेव्हा त्याला लघवीमध्ये जळजळ जाणवते.
2. जे लोक तिखट, मसाले आणि तळलेले अन्न जास्त खातात, त्यांना सामान्य लोकांपेक्षा जास्त लघवी होते आणि त्यामुळे लघवीमध्ये जळजळ होते.
3. अनेकांना किडनीमध्ये स्टोन होतात. किडनी स्टोन वाढू लागल्यास सुद्धा अशी जळजळ होते. त्यामुळे जर सतत त्रास होत असेल तर डॉक्टरांना अवश्य दाखवावे.
लघवीत जळजळ थांबवण्यासाठी घरगुती उपाय
१ - भरपूर पाणी प्या.
२ - लिंबूपाणी आणि पुदिनाचा अर्क प्या.
३ - फळांचा रस प्या.
4 - अधिकाधिक हिरव्या भाज्या खा.
५ - नारळ पाणी प्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.