Cancer cells removed jaw rebuilt Successful surgery on cancer patient in Kothrud hospital in 4 hours sakal
आरोग्य

Health News : कॅन्सरच्या पेशी काढल्या, जबडा पुन्हा तयार केला; कॅन्सर रुग्णावर ४ तासात यशस्वी शस्त्रक्रिया

कोथरूड हॉस्पिटलमध्ये कॅन्सर रुग्णावर ४ तासात यशस्वी शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

कोथरूड : बीड येथील अनिल प्रभाकर बहीर (वयः३९) यांच्या डाव्या जबड्यात कॅन्सर झाला होता. त्यामुळे त्यांना तोंड उघडताही येत नव्हते. ते बोलण्यास ही असमर्थ होते. कोथरूड हॉस्पिटल’ ने तोंडातील जबड्याच्या कॅन्सरच्या गुंतागुंतीच्या समस्येवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून त्यांना नव जीवन दिले.

कोथरूड हॉस्पिटल’ मध्ये तोंडातील जबड्याच्या कॅन्सरच्या गुंतागुंतीच्या समस्येवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली. याविषयी सर्जन डॉ. राजेंद्र गुंडावार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र मिटकर, भूलतज्ञ डॉ.दिप्ती पोफाळे आणि रूग्ण अनिल बहीर उपस्थित होते.

रुग्णाचा आजार खूप वाढल्यावर नातेवाइकांनी त्यांना पुण्यातील कोथरूड हॉस्पिटलमध्ये आणले. आमच्या हॉस्पिटलमध्ये रूग्णाची तपासणी करून सर्व चाचण्या केल्या. त्यांच्या जबड्यामध्ये ‘कॉप्लेजिक्ट रिसेक्शन’ नावाचा कॅन्सरचे लक्षण दिसले.

त्यानंतर ४ तासांची गुंतागुंताची शस्त्रक्रिया करून रुग्णाला वेदनांपासून मुक्त करण्यात आले. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्ण आज बोलू लागले. सर्जन डॉ. राजेंद्र गुंडावर यांच्यासह डॉ. संभूस, डॉ. लिना दोभाड, डॉ. राजेंद्र मिटकर यांनी शस्त्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली.

डॉ. राजेंद्र गुंडावार म्हणाले,“एवढ्या तरूण युवकाच्या खालच्या व वरच्या जबड्यांची पहिल्यांदाच शस्त्रक्रिया केली. तोंडाच्या आतील डाव्या बाजूच्या जबड्यातीच्या कॅन्सरच्या जखमा बरा करण्यात यशस्वी झालो.

ऑपरशेन सुरू केल्यानंतर पहिल्या टप्प्यात कॅन्सर रोगाने संक्रमित जबड्याचा भाग मोठ्या फरकाने बाहेर काढण्यात आला. यानंतर दुसर्‍या टप्प्यात मानेमध्ये पसरलेला कॅन्सरचा भाग कापला गेला. तिसर्‍या टप्प्यात वरच्या जबड्यातील पाठिमागचा संपूर्ण भाग बाहेर काढला.

त्यानंतर उर्वरित जागा भरण्यासाठी छातीच्या आतिल काही भाग काढून तो जबड्यात बसविण्यात आला. म्हणजेच उर्वरित जागा त्या वस्तुमानाने भरली गेली. सतत ४ तास टीम ने या शस्त्रक्रियेत झुंज दिली गरजेनुसार रूग्णाला काही दिवस किमोथेअपी दयावी लागेल.”

रूग्ण अनिल बहीर म्हणाले,“माझी परिस्थिती अत्यंत बिकट असतांनाही कोथरूड हॉस्पिटलने सामाजिक कर्तव्य म्हणून माझ्यावर केलेल्या शस्त्रक्रियेमुळे मला जीवनदान मिळाले आहे. कॅन्सरसारखा आजार माणसाला केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आणि आर्थिकदृष्टयाही हादरवून सोडतो.”

डॉ. राजेंद्र मिटकर म्हणाले,“ रिक्शा चालक रूग्णाला बर्‍याच वर्षापासून तंबाखू व गुटखाच्या सेवनाची सवय होती. वाढत्या वयानुसार त्यांना तोंडाचा त्रास सुरू झाला. बीडमध्ये अनेक डॉक्टरांकडून चेकअप केल्यानंतर ते आमच्याकडे उपचारासाठी आले. रुग्ण आता पूर्णपणे बरा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT