Chest Pain : हल्ली बदलत्या लाईस्टाईलनुसार अनेक सवयी बदलल्या आहेत ज्याचा थेट परीणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावर होतोय. बदलत्या लाईफस्टाईलचा सर्वात मोठा परीणाम होतो तो आपल्या आरोग्यावर आणि शरीराचे दुखणे सुरू होते.
शरीराच्या दुखण्यामागे सर्वात जास्त छातीचे दुखणे खुप धोकादायक असत. अनेकदा छातीच्या दुखण्याचा हार्ट अटॅकवर थेट परीणाम पडतो त्यामुळे छाती दुखायला लागली की अनेकांच्या मनान अनेक शंका येतात पण आज आम्ही तुम्हाला छाती दुखण्यामागील काही महत्त्वाची कारणे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (causes of chest pain )
१. अनेकदा आपण भरपूर जेवण करतो पण आराम आपला पुरेसा होत नाही. अशावेळी स्ट्रेसमुळे आणि रेस्ट न मिळाल्याने छाती दुखायला लागते.
२. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेही अनेकदा छाती दुखते. शरीराला पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे छातीत वेदना व्हायला लागतात.
३. अनेकदा लंग्समध्येसुद्धा त्रास जाणवला की त्याचा थेट परीणाम आपल्या छातीवर होतो आणि छाती दुखायला लागते.
४. अनेकदा स्नायुंच्या दुखण्यामुळेही छातीत त्रास जाणवतो. पाठदुखी मानदुखी किंवा पोटदुखीमुळेही छातीत त्रास जाणवतो.
५. अनेकदा चुकीच्या प्रकारे झोपल्यामुळे किंवा एकाच स्थितीत फार काळ बसल्यामुळे किंवा झोपल्यामुळेही छाती दुखते.
६. अनेकदा श्वास कोंडल्यामुळे किंवा श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळेही छातीत त्रास जाणवतो.
७. अॅसिडीटीमुळे अनेकदा छातीत जळजळ जाणवते. अनेकदा अशावेळी छातीत त्रास जाणवतो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.