Organ Donation esakal
आरोग्य

Organ Donation : आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव करणार मृत्यूपश्चात अवयवदान ! कशी असते प्रक्रिया?

Monika Lonkar –Kumbhar

Organ Donation : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ७१ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नुकताच दिल्लीत पार पडला. मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांची वर्णी लागली असून त्यांनी नुकताच आरोग्य राज्यमंत्र्याचा पदभार स्विकारला आहे.

हा पदभार स्विकारल्यानंतर प्रतापराव जाधवांनी घोषणा केली की, ते मृत्यूनंतर अवयवदान करणार आहेत. ही अवयवदान करण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे? आणि मृत्यूनंतर व्यक्ती कोणत्या अवयवांचे दान करू शकते? त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

मृत्यू झाल्यानंतर कोणत्या अवयवांचे दान केले जाऊ शकते?

अवयवदानामध्ये शरीरातील काही अवयव आणि ऊतींचे दान करता येते. या अवयवांमध्ये यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड, हृदय, फुफ्फुसे आणि आतडी यांचा समावेश आहे. आता ऊतींबद्दल बोलायचे झाल्यास मृत्यू झालेल्या व्यक्तीचा डोळ्यांचा भाग, हाडे, त्वचा, हृदयाचे वॉल्व, रक्तवाहिन्या आणि इतर काही ऊतींचा अवयव दानामध्ये समावेश आहे.

अवयव दानाचे प्रकार कोणते?

अवयव दानाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे जिवंत व्यक्तीकडून केले जाणारे अवयवदान ज्याला वैद्यकीय भाषेत Living Donor Organ Donation असे म्हणतात. दुसरा प्रकार म्हणजे ब्रेन डेड किंवा मृत व्यक्तीकडून केलं जाणार अवयवदान याला Deceased Donor Organ Donation असे म्हटले जाते.

काही आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, मेंदू मृत (ब्रेन डेड) झालेल्या व्यक्तीचे हृदय, यकृत, किडनी, स्वादुपिंड, डोळ्यांचा भाग, फुफ्फुस त्वचा आणि हाडांचे दान केले जाऊ शकते.

जर जिवंतपणी अवयव दान करायचे असेल तर त्या व्यक्तीला किडनी, यकृत आणि स्वादुपिंडाचा भाग डोनेट करता येतो. तसेच, काही लोक मृत्यूनंतर देहदान देखील करतात. देहदानानंतर हा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वापरता येतो.

जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला असेल तर त्या व्यक्तीचे जवळचे नातेवाईक त्याचे डोळे, त्वचा आणि हाडांचे देखील दान करू शकतात.

अवयवदानासाठी वयाची सीमा किती?

जर एखाद्या व्यक्तीला जिवंत असताना अवयव दान करायचे असेल, तर त्या व्यक्तीचे शरीर सुदृढ असणे अत्यंत आवश्यक आहे. १८ वर्षे वयाची कोणतीही निरोगी व्यक्ती अवयव दान करण्यास पात्र आहे.

परंतु, शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांसाठी वयोमर्यादा ही वेगळी असते. जे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच दान करता येते. मेंदू मृत झालेली व्यक्ती किंवा मृत झालेल्या व्यक्तीचे अवयव दान करता येते. त्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नाही.

अवयवदानाची प्रक्रिया काय आहे?

अवयवदानाची प्रक्रिया सांगायचे झाल्यास ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून किंवा संबंधित रूग्णालयाशी संपर्क साधून अवयवदानासाठी नोंदणी करू शकता.

ज्या व्यक्तीला अवयव दान करायचे आहे, त्याच्या नोंदणीच्या वेळी दोन्ही साक्षीदार हजर असणे आवश्यक आहे. या दोन साक्षीदारांपैकी एक साक्षीदार व्यक्तीच्या कुटुंबातील असायला हवा. हे अयवदान पूर्णपणे ऐच्छिक असते हे लक्षात घ्या.

ही नोंदणी केल्यानंतर त्या व्यक्तीला डोनर कार्ड दिले जाते. त्यानंतर, संबंधित व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाने रूग्णालयाशी संपर्क साधवा लागतो. संपर्क झाल्यानंतर, हॉस्पिटल मार्फत त्या व्यक्तीचे अवयव काढून घेतले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT