Benefits of Chakrasana esakal
आरोग्य

Benefits of Chakrasana : डोळ्यांची दृष्टी, कंबरदुखी आणि बरंच काही! 'हे' योगासन करेल आजारांची सुट्टी

Benefits of Chakrasana : चक्र म्हणजे चाक आणि आसन म्हणजे ते करण्याची पद्धत होय. या योगासनाचा सराव केल्याने आपले शरीर चाकाचा आकार घेते.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits of Chakrasana : निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे योगा करणे आणि संतुलित आहार घेणे फायदेशीर आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आणि उत्तम मानसिक आरोग्यासाठी योगासनांचा सराव करणे फायदेशीर असल्याचे मत आरोग्य तज्ज्ञांचे आहे.

विविध प्रकारची योगासने केल्याने शारिरीक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. योगासनांमध्ये अनेक प्रकारच्या योगासनांचा समावेश होतो. त्यापैकीच एक असलेले चक्रासन आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. ज्याला ‘बॅक-बेंडिंग’ योगा पोझ असे ही म्हटले जाते.

चक्र म्हणजे चाक आणि आसन म्हणजे ते करण्याची पद्धत होय. या योगासनाचा सराव केल्याने आपले शरीर चाकाचा आकार घेते. दररोज हे योगासन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. चला तर मग जाणून घेऊयात हे चक्रासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे.

चक्रासन करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • या योगासनाचा सराव करायला अवघड आहे. तुलनेने कठीण मानले जाणारे हे योगासन करण्यासाठी विशेष कौशल्याची गरज आहे. अन्यथा तुम्हाला दुखापत होऊ शकते.

  • हे योगासन जर तुम्ही पहिल्यांदाच करणार असाल तर, योगा तज्ज्ञाची मदत घ्या.

  • या योगासनाचा सराव करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पाठीवर झोपा.

  • त्यानंतर, तुमचे दोन्ही गुडघे वाकवा आणि तुमच्या टाचांना शक्य तितक्या जवळ आणा.

  • पायाचे तळवे जमिनीला समांतर ठेवा.

  • तुमचे पाय तसेच, तळवे यांचा वापर करून शरीर वर उचलण्याचा प्रयत्न करा.

  • आता तुमचे दोन्ही पाय खांद्यांच्या समांतर रेषेत ठेवा.

  • आता तुमचे शरीर वरच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न करा. या स्थितीमध्ये तुम्हाला शरीरात ताण जाणवेल.

  • आता काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर, पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या.

चक्रासनाचे फायदे

  • चक्रासनाचा नियमित सराव केल्याने शारिरीक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.

  • डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी हे योगासन फायदेशीर आहे.

  • ताण-तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी हे योगासन मदत करते.

  • चक्रासनाचा नियमित सराव केल्याने मणक्याची लवचिकता आणि ताकद वाढते.

  • या योगासनाचा दररोज सराव केल्याने स्टॅमिना आणि ताकद वाढण्यास मदत होते.

  • पचनाच्या समस्यांपासून आणि कंबर पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी हे योगासन अतिशय प्रभावी मानले जाते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT