मानसिक आरोग्य Esakal
आरोग्य

‘या’ मुळं बिघडतेय Mental Health त्वरित बदला त्या सवयी..

मानसिक संतुलन आणि आरोग्य जपणं ही काळाजी गरज निर्माण झाली आहे. जर तुमचं मानसिक आरोग्य उत्तम असेल तर तुम्ही शारिरीकदृष्ट्याही फिट राहता.

सकाळ डिजिटल टीम

ज्याप्रमाणे काही वाईट सवयींचा तुमच्या शरिरावर नकारात्मक परिणाम होत असतो अगदी त्याचप्रमाणे तुमच्या काही सवयींमुळे तुमचं मानसिक आरोग्य Mental Health बिघडू शकतं. अनेकदा हे बिघडलेलं मानसिक आरोग्य लक्षात येत नाही, त्याचे दुष्परिणाम दिसून येत नाहीत. मात्र यामुळे अनेकजण नकळत नैराश्यात Depression जात असतात जे अत्यंत धोकादायक आहे. Change Habits That Are Sabotaging Your Mental Health

त्यामुळेच मानसिक संतुलन आणि आरोग्य Health जपणं ही काळाजी गरज निर्माण झाली आहे. जर तुमचं मानसिक आरोग्य उत्तम असेल तर तुम्ही शारिरीकदृष्ट्याही फिट राहता. आरोग्याच्या अनेक समस्या या मानसिक आरोग्याशी निगडीत असल्याच संशोधनातही समोर आलंय.

प्रत्येक वेळी इतर व्यक्ती किंवा सभोवतालची परिस्थिती ही मानसिक आरोग्य बिघडण्यासाठी जबाबदार नसते. तर अनेकदा आपल्या न कळतच आपल्याच काही सवयींचा आपल्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत असतो. यासाठी या सवयी बदलणं किंवा त्यात वेळीच सुधारणा करणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही सवयी सांगणार आहोत ज्यामुळे कदाचित न कळत तुम्हच मानसिक आरोग्य बिघडू लागलंय. यातील काही सवयी तुमच्या रोजच्या आयुष्यातील भाग बनल्या आहेत. मात्र त्या बदलं शक्य आहे.

सोशल मीडियाचा अतिवापर- अलिकडे सोशल मीडिया हे जगाला जोडण्याचं माध्यम ठरतंय. तसचं सोशल मीडियामुळे जगभरात काय चाललंय याची माहिती सहज उपलब्ध होते. मात्र सोशल मीडियाचा अतिरेक हा मानसिक आरोग्याला धोका ठरत आहे. सोशल मीडियामुळे नकळत स्पर्धा, क्रोध, मत्सर या भावना बळावू लागल्या आहेत. तरुणांमध्ये सोशल मीडियामुळे स्पर्धा निर्माण झालीय. यामुळे त्याचं मानसिक स्वास्थ धोक्यात आलंय. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर कमी करणं गरजेचं आहे. (Social Media over use)

हे देखिल वाचा-

स्वत:ला वेळ देणे- अलिकडे धावपळ आणि कामाच्या गडबडीत अनेकजण स्वत:ला वेळ देत नाहित. कामात प्रामाणिक असल्याने आजारी असतानाही ऑफिसला जाणं, काम करणं यामुळे योग्य विश्रांती मिळत नाही परिणामी मानसिकदृष्ट्या याचा वाईट परिणाम होत असतो. याशिवाय अनेकजण कामात इतके व्यग्र असतात की स्वत:साठी वेळ काढणं ते विसरून जातात. यामुळेही मानसिकरित्या ताण वाढत असतो.

ओटीटीवर बिंज वॉच करा कमी- अलिकडे ओटीटीवर बिंज वॉच करण्याचा ट्रेंड वाढतोय. रात्रीची झोप विसरून सलग अनेक तास वेब सीरिज पाहिल्या जातात. यामुळे झोप कमी होते. शिवाय हिंसा दाखवणाऱ्या काही वेब सीरिजचा मनावरही विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे सलग अनेक तास वेब सीरिज पाहणं कमी करा आणि पुरेशी झोप घ्या. 

व्यायाम न करणं- दररोज पुरेसा व्यायाम न केल्यानेही मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकतं. एक्सर्साइज म्हणजेच व्यायाम हा मानसिक आरोग्य सुधारण्यासाठीचा एक उत्तम पर्याय आहे. व्यायाम केल्याने एंडोर्फिन आणि इतर हॅपी हार्मोन रिलीज झाल्याने नैराश्य कमी होण्यास मदत होते. तसचं व्यायामुळे शरिराचं तापमान संतुलित राहण्यास मदत होते. त्यामुळेच मेंदूला शांत ठेवण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. Exercise for mental health.

अतिविचार बंद करा- अनेकांना सतत विचार करण्याची सवय असते. अति विचार करणं हे त्रासदायक ठरू शकतं याची कल्पना असूनही अनेक जण एखाद्या गोष्टीचा किंवा परिस्थितीचा अति विचार करतात. अति विचार करण्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होवू  शकतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे अति विचार करणं वेळेतच बंद करा.

हे देखिल वाचा-

परफेक्शनिस्ट- कोणत्याही गोष्टीत परफेक्शन असणं कधीही योग्य मात्र अनेक जण प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट करण्याच्या प्रयत्नात तणावात जातात. मानसशास्त्राच्या अभ्यासानुसार सकारात्मक परफेक्शिझम perfectionism आणि नकारात्म असे दोन प्रकार असतात. यातील पहिल्या प्रकारातील व्यक्ती सर्व कामं परफेक्ट म्हणजेच नीट नेटकी, वेळेवर करातात आणि आनंदी राहतात. मात्र नकारात्मक परफेक्शिझममध्ये ती व्यक्ती काम योग्य प्रकारे, नीट नेटक, वेळेत आणि परफेक्ट न झाल्यास दु:खी होते. कामातील चुका शोधणे त्यातील त्रुटी शोधून असमाधानी राहणे. यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. 

या सवयींव्यतिरिक्त वेळेत आणि पूर्ण झोप घेणं आवश्यक आहे. ज्या व्यक्ती रोज वेळेत झोपून वेळेत उठतात त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं. त्याचप्रमाणे सतत इतरांशी तुलना करणं, प्रत्येक गोष्ट सामान्यपणे घेणं, एखाद्या गोष्टीच्या मागे सतत पळत राहणं या सवयींमुळेही मानसिक आरोग्य बिघडू शकतं. तसचं वेळेचा सदूपयोग करणंही गरजेचं आहे. अनेक जण खूप मोकळा वेळ असल्याने सतत पार्टी करणं, फिरणं आणि मौज मजा करण्यात वेळ घालवतात. मात्र यामुळेही काही काळाने नैराश्य येऊ शकतं. त्यामुळे तुमचा मोकळा वेळ चांगल्या कामांसाठी खर्ची करणं गरजेचं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT