Child Health Care Sakal
आरोग्य

Child Health Care: मुलांसाठी 'केळी' सुपर फूड; आहारात कधी अन् कसा समावेश करावा? वाचा तज्ज्ञ काय सांगतात

पुजा बोनकिले

Child Health Care: केळी हे असे फळ आहे जे बाराही महिने बाजारात मिळते. केळीमध्ये पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, यासारखे अनेक पोषक घटक असतात. हे सर्व घटक निरोगी शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळेच सुपरफूडच्या यादीत केळीचा समावेश होतो. पण केळीसंबंधी प्रश्न अनेक पालकांना पडतात. जसे की, मुलांना केळी कधी आणि कसे खायला द्यावे,कोणत्या ऋतूत खायला द्यावे. या सर्व प्रश्नांची उत्तरे बाल रोगतज्ज्ञांनी दिले आहे.

मुलांसाठी केळी किती फायदेशीर आहे?

  • तज्ज्ञांच्या मते, केळी मऊ आणि सहज पचतात. यामुळे सहा महिने पुर्ण झाल्यावर बाळाच्या आहारात केळीचा समावेश करू शकता. केळीमध्ये असलेले पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन सी मुलाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.

  • प्रवासात मुलांसाठी केळी एक सुपरफूड आहे. जे तुम्ही मुलाला भूक लागल्यावर कुठेही खायला देऊ शकता. केळी सहज कुठेही नेता येते.

  • बाळाला पहिल्यांदा केळी खायला घालताना पुर्ण पिकलेले केळी खायला द्यावे. तुम्ही केळी चांगले मॅश करू शकता आणि थोड्या प्रमाणात दूध देऊन ते तुमच्या मुलाला देऊ शकता.

  • मुलाला केळी खायला घालताना त्याच्यावर नेहमी लक्ष ठेवा. वयानुसार तुम्ही केळीचे प्रमाण हळूहळू वाढवू शकता.

  • केळीमध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुरळित ठेवते. केळ्यातील पेक्टिन नावाचे फायबर पाण्यात विरघळणारे असते. हे कर्बोदकांमधे मुक्त प्रवाहित साखरेमध्ये रूपांतरित करते. जे पचनास मदत करते आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्यांमध्ये देखील बाळांना फायदा मिळतो. तसेच केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.

  • लहान मुले खुप चपळ असतात. यामुळे त्यांना नेहमी भरपूर ऊर्जा लागते. यासाठी पिकलेली केळी खायला द्यावी. केळी शरीराची ऊर्जा वाढवणारी असते. यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स बाळाला त्वरित ऊर्जा देतात.

  • केळी खाल्याने सर्दी-खोकल्याचा त्रास होत नाही.

लहान मुलांना प्रत्येक ऋतुत केळी खायला द्यावीत का?

बालरोग तज्ज्ञ सांगतात की, उन्हाळा असो की हिवाळी केळी एक एक सुपरफुड आहे. केळीची आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sai Baba: वाराणसीतल्या मंदिरांमधून साई बाबांच्या मूर्ती हटवल्या अन् गंगेत केल्या विसर्जित; सनातन रक्षक दलाचं कृत्य

Shivneri Bus: शिवनेरी बसमध्ये आता 'शिवनेरी सुंदरी'; हवाई सेवेच्या धर्तीवर भरत गोगावलेंची पहिलीच मोठी घोषणा

Sharad Pawar: सर्वात मोठी खेळी! शरद पवारांच्या पक्षात हा मोठा पक्ष होणार विलिन; हजारो कार्यकर्त्यांचा या दिवशी प्रवेश

Latest Maharashtra News Live Updates : पुण्यात पाणाच्या डबक्यात पडून तरुणाचा मृत्यू

''या क्षणाला आम्हालाही खात्री नाही''; MS Dhoniच्या आयपीएल २०२५ खेळण्याबाबत CSK चं मोठं विधान; त्याला Uncapped...

SCROLL FOR NEXT