Child Health Care: Sakal
आरोग्य

Child Health Care: योग्य पोषणासाठी ५ वर्षापर्यंतच्या बाळांचा आहार कसा असावा? वाचा डॉक्टर काय सांगतात

Child Health Care: अनेक पालकांना ५ वर्षावर्यंतच्या मुलांना योग्य पोषणासाठी काय खायला द्यावे हे कलत नाही. अशावेळी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळांना पुढील काही पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.

पुजा बोनकिले

Child Health Care: सकस आहार आणि व्यायाम केल्यास आरोग्य निरोगी राहते. मग वय कोणतेही असो शरीराला योग्य प्रमाणात पोषक घटक मिळणे आवश्यक असते. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आपल्या बालपणातील आवडीनिवडी आणि घरातील वातावरणाशी निगडीत असतात.

पालकवर्ग मुलांना संतुलित आणि पोषक आहार देण्यावर भर देतात. आहाराच्या सवयी कुटुंबापासून सुरू झाल्यामुळे आणि पालक मुलाच्या योग्य आहाराच्या सवयींचा भक्कम पाया घालू शकतात. अशावेळी मुलांना संतुलित आहार देण्याचे आणि त्यांना आयुष्यभर निरोगी आहाराच्या सवयी पाळण्यास प्रवृत्त करण्याचे काम पालक करू शकतात.

डॉ. पी.के. मिश्रा, बाल रक्षा भारत अभियानाचे प्रमुख यांनी पुढे काही टिप्स दिल्या आहेत. ज्याचा वापर करून पालक त्याच्या मुलांना निरोगी आयुष्य देऊ शकतात.

Family Lunch

आहारात विविधता आणावी

मुलांना विविध प्रकराचे पदार्थ खायला दिवे पाहिजे. यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे तिरंगा पद्धत वापरावी. आहारात केशरी, पांढरा आणि हिरव्या पदार्थांचा समावेश करावा. उदाहरणार्थ, केशरी रंगासाठी तुम्ही डाळी, संपूर्ण धान्य इत्यादीपासून तयार केलेली खिचडी मुलाला देऊ शकता. पांढऱ्या रंगासाठी दूध, तांदूळ किंवा अंडी आणि हिरव्या रंगासाठी मुलांच्या ताटात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करू शकता.

पोषक पदार्थांचे महत्व

निरोगी प्लेट कशी बनवली जाते ते तुमच्या मुलाला सांगा. त्यातील पोषण आणि संतुलित आहाराचे फायदे समजावून सांगावे. बालपणात दिलेले पोषण शिक्षण पुढेही फायदेशीर ठरते.

एकत्र जेवण करावे

जर आई-वडील वर्किंग असेल तर दिवसातून एकदा तरी एकत्र जेवण करावे. शक्यतो संध्याकाळी एकत्र जेवण करावे.

आनंदाने खावे

जेवण करणे म्हणजे केवळ पोट भरणे नाही. एकत्र जेवण करणे म्हणजे कुटूंबासोबत एकत्र वेळ घालवण्याची ही एक उत्तम संधी आहे. जेवतांना मनोरंजक विषय निवडावे. जेवणाची वेळ प्रत्येकासाठी आरामदायी आणि आनंददायक असावी.

Healthy Diet

टीव्ही पाहताना जेवण करू नका

आजकालच्या मुलांना जेवताना टीव्ही आणि फोन पाहायला आवडते. यामुळे जेवणाकडे लक्ष राहत नाही. जेवताना अन्न, त्याची चव, रंग आणि तापमान याकडे लक्ष द्यावे.

भूक नसताना खायाल देऊ नका

भूक नसताना जास्त जेवण केल्यास पचनसंस्थेवर ताण वाढतो आणि लठ्ठपणा येऊ शकतो. अनेक लोक कँडी, क्रॅकर्स, खारे शेंगदाणे, पिझ्झा किंवा बर्गरसारखे प्रक्रिया केलेले पदार्थ अधिक खातात. परंतु या पदार्थांमध्ये मीठ, साखर आणि फॅट्स जास्त असते. त्यामुळे या सर्व पदार्थांचे सेवन करताना काळजी घ्या.

पॅकिंगवरचे लेबले वाचा

फूड पॅकेजच्या मागील बाजूस लिहिलेले घटक वाचण्याची सवय स्वत:ला लावून घ्यावी. आपल्या आहारातील मीठ, साखर आणि चरबीचे प्रमाण नियंत्रित करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे. लेबल वाचण्याची सवय लावून घेतल्यास, तुम्ही केवळ स्वतःलाच नाही तर तुमच्या मुलांनाही योग्य पोषण मिळण्यास मदत कराल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT