Healthy Diet For Child: Sakal
आरोग्य

Healthy Diet For Child: मुलांना योग्य वयात पोषक आहार द्यावा, ICMR ने दिल्या महत्वाच्या सुचना

Healthy Diet For Child: आयसीएमआरने भारतीय आहार पद्धतीनुसार लहान मुलांना कोणत्या वयात कोणता आहार द्यावा याबाबत माहिती दिली आहे.

पुजा बोनकिले

Healthy Diet For Child: बदलत्या वातावरणात आरोग्यासह आहाराचीही काळजी घेणे गरजेचे असते. खास करून लहान मुलांच्या आहाराकडे जास्त लक्ष देणे गरजेचे असते. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) भारतीय पद्धतीनुसार वेगवेगळ्या वयोगटातील लोकांसाठी आहाराचे मार्गदर्शन केले आहे. यामध्ये लहान मुलांवर जास्त भर दिला गेला आहे.

आरोग्य मार्गदर्शिकेत असेल म्हटले आहे की आपल्याकडे अनेक लहान मुलांना योग्य तो आहार देण्यात येत नाही. काही महिला लहान बाळांना स्तनपान करत नाहीत. नोकरी- व्यवसायामुळे किंवा इतर कामांमुळे मुलांचे वरचे दुध किंवा दूधाची वापजर सुरू करतात. पण याचा शरीरावर सकारात्मक असा परिणाम होत नाही.

यामुळे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने आईच्या आहारावर भर दिला आहे. माताच्या आहारात इसेन्शियल अॅमिने अॅसिड अणे खुप गरजेचे आहे. तसेच इतर जीवनसत्वे आणि क्षार देखील असणे महत्वाचे आहे. आईचे आरोग्य निरोगी तर बाळ निरोगी राहील. आईच्या दूधातून मुलांना पोषण मिळते आणि त्यांची वाढ होते.

मुलांसाठी विशेष सुचना

कमीत कमी सहा महिने मुलांना आईचे दूध द्यावे.

मुल आजारी पडल्यास त्याच्या आहाराची योग्य काळजी घ्यावी.

नेहमी आहारात पोषक आणि सकस पदार्थांचा आहारात समावेश करावा.यामुळे त्याची वाढ आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.

आहारात फास्ट फूड, साखर, तेलकट किंवा प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा समावेश टाळावा.

रोजच्या आहारात आयोडिनयुक्त मीठाचा समावेश करावा.

मुलांनी मैदानी खेळ खेळावे आणि व्यायाम करावा.

आहारात सर्व पदार्थांचा असावा समावेश

लहान मुलांना रेडी टू इट, आणि मैदाचे पदार्थ देणे टाळावे. यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, स्थुलपणा यासारख्या समस्या उद्भवतात. लहान मुलांना निरोगी आणि तंदुरूस्त ठेवायचे असेल तर आहारात विविधता ठेवावी. बदलत्या वातावरणानुसार आहारात बदल करावा. मुलांच्या रोजच्या आहारात पालेभाज्या ,तडणधान्य, फळभाज्या, कंदमुळ, मोड आलेले कडधान्य, सुकामेवा,दूध यांचा समावेश असला पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT