coping with stress tips stress management type treatment healthy life sakal
आरोग्य

Stress Management : तणावाचा सामना

प्रत्येकाला आपल्या जीवनात वेगवेगळ्या कारणांमुळे तणावाशी सामना करावा लागतो. त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

सकाळ वृत्तसेवा

Stress Management : प्रत्येकाला आपल्या जीवनात वेगवेगळ्या कारणांमुळे तणावाशी सामना करावा लागतो. त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. काही जणांना आपण तणावाखाली आहोत याची जाणीव होत नाही, ते कधी कधी विविध लक्षणांद्वारे आपल्याला लक्षात येते.

मला तणाव आहे का? याचा शोध घेण्यासाठी तुम्ही पुढील प्रयोग करून बघू शकतात.

१) शारीरिक तणाव

- धडधड होणे.

- वारंवार डोकेदुखी होणे, वारंवार आजारी पडणे,

- दीर्घकालीन आरोग्य समस्या होणे.

२) मानसिक तणाव

- लक्ष केंद्रित करण्यात असमर्थता

- स्मृतिभ्रंश

- वारंवार चिंता अनेकदा भीती किंवा काळजीबद्दल बोलतात.

३) वर्तणुकीशी संबंधित

- नेहमी पेक्षा अन्नाचे अधिक सेवन

- जास्त खाणे, किंवा कमी खाणे

- स्वत:ला इतरांपासून वेगळे करणे, किंवा तुमच्या विशिष्ट जबाबदाऱ्या टाळणे

- व्यक्तिमत्त्वात तीव्र बदल.

४) भावनिक तणाव

- सारखा राग करणे, इतरांवर ओरडणे,

- कारण नसताना जोरजोरात संभाषण करणे, रडणे,

- चिडचिड होणे, झोप कमी होणे किंवा झोप लागायला फार त्रास होणे.

- मनात निराशेची भावना निर्माण होणे.

वरील लक्षणे आपणास दिसत असल्यास तणाव कमी करण्यासाठी खालील उपाययोजना करता येईल.

१) स्वत:ची काळजी घ्या

- पुरेशी विश्रांती झोप घ्यावी, निरोगी खा.

- अतिरिक्त व्यायाम, जास्त शारीरिक श्रम टाळा, आपल्याला झेपेल तेवढेच काम काम करावे.

२) शारीरिक तपासणी करून घेणे

- तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रक्ताची तपासणी करून घेणे.

- त्यामुळे तणावामुळे आपल्या आरोग्यावर काही परिणाम झाला असल्यास आढळून येईल.

३) सोशल मीडियावरील बातम्यांपासून, टीव्हीपासून काही काळ दूर रहावे, प्रवचन, मेडिटेशन करणे, आपल्या ताणांबद्दल मित्रांशी किंवा जवळच्या लोकांशी संवाद साधावा.

४) ज्या गोष्टीत आपल्याला रस आहे ते उपक्रम राबवा.

५) ड्रग्ज, दारू, सिगारेट, तंबाखू इत्यादी व्यसन लागणाऱ्या गोष्टीपासून दूर रहा.

६) अति निराशाजनक स्थिती निर्माण झाल्यास एखादा सामाजिक कार्यकर्ता किंवा व्यावसायिक समुपदेशकाशी बोला. मानसिक तज्ज्ञ काही औषधे देऊन काही काळासाठी तुमचा तणाव कमी करतील. त्यांना नियमित भेटणे गरजेचे आहे.

आजकाल लहान व किशोरवयीन मुलांमध्ये तणावाचे प्रमाण वाढले आहे. मुले त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या तणावपूर्ण घटनांबद्दल काय पाहतात आणि ऐकतात याचे निरीक्षण करा.

१) मुलांच्या दिनचर्येत सारखे बदल करू नका, पुरेशी झोप व शारीरिक व्यायामाचा समावेश करा.

२) मुलाचे विचार आणि भावना ऐका आणि तुमचे विचारही त्यांना पटवून द्या. एखाद्या क्लेशकारक घटनेनंतर तुमच्या मुलाचे बोलणे ऐकून घ्या. त्याच्या मनातील भीती घालवा.

३) अनेकदा पालक पाल्यांना पुरेसा वेळ देत नाही. त्यांच्या वर्तणुकीत काही बदल जाणवतात की नाही हे तपासा. त्यांना आधाराची आवश्यकता असू शकते.

४) मुलाला त्याच्या सुरक्षिततेबद्दल आणि आरोग्याबद्दल आश्वस्त करा.

५) त्यांना प्रेमाने जवळ करा, त्यांची आपल्याला काळजी आहे हे पटवून द्या. स्वतःची काळजी व आपत्कालीन स्थितीत सामना कसा करावा हे शिकवून देणे गरजेचे आहे. त्यांना दररोज लहानसहान कामे करण्यात गुंतवा व पूर्ण झाल्यास त्यांना एक बक्षिसही द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT