Corona Vaccination sakal
आरोग्य

कोरोना लसीपासून मिळालेली इम्युनिटी किती काळ राहाते? संशोधनातून खुलासा

सकाळ डिजिटल टीम

सध्या सगळीकडे कोरोना (corona) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, यातच ज्या नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना देखील कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. या दरम्यान एआयजी हॉस्पिटल आणि एशियन हेल्थ केअर, हैदराबाद यांनी केलेल्या एका महत्त्वपूर्ण संशोधनाचे निकाल नुकतेच समोर आले आहेत. ज्यामध्ये अँटीबॉडीच्या पातळीच्या संदर्भात लसी घेतल्यानंतर रुग्णांना मिळणारी प्रतिकारशक्ती (Immunity) किती काळासाठी राहते याविषयी मोठा खुलासा करण्यात आला आहे.

वैज्ञानीकांना या अभ्यासात असे आढळून आले की, जवळजवळ 30% व्यक्तीमध्ये कोरोना लसीने तयार केलेल्या प्रतिकारशक्तीचा प्रभाव 6 महिन्यांनंतर संपतो. AIG हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. डी. नागेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, सध्याच्या लसींची दीर्घकालीन परिणामकारकता समजून घेणे आणि काही विशिष्ट लोक आहेत का, ज्यांना लवकरात लवकर बूस्टरची आवश्यकता आहे हे पाहणे या अभ्यासाचे उद्दिष्ट होते.

ते म्हणाले की, संशोधकांनी संपूर्ण लसीकरण झालेल्या 1,636 आरोग्यसेवा कर्मचार्‍यांच्या मोठ्या गटावर हा अभ्यास करण्यात आला, ज्यांच्यात 15 AU/ml पेक्षा कमी अँटीबॉडी पातळी होती, त्यांना अँटीबॉडी निगेटिव्ह मानले गेले, याचा अर्थ त्यांच्यात विषाणूविरूद्ध कोणतीही संरक्षणात्मक प्रतिकारशक्ती विकसित झाली नाही.

ते पुढे म्हणाले की, 100 AU/ml ची अँटीबॉडीजची पातळी ही विषाणूपासून संरक्षणासाठी आवश्यक असलेली किमान पातळी आहे. 100 AU/ml अँटीबॉडी पातळीपेक्षा कमी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला संसर्ग होण्याची शक्यता असते, या आभ्यासात सहभागी झालेल्या 1,636 जणांपेकी 93% ने कोविशील्ड, 6.2% ने कोवॅक्सिन आणि 1% पेक्षा कमी लोकांना स्पुतनिक लस घेतली. तसेच या व्यक्ती प्रामुख्याने 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या आजारांनी ग्रस्त होत्या. तर यातील एकूण पैकी 6% लोकांनी रोगप्रतिकारक संरक्षण अजिबात विकसित केले नाही.

दरम्यान वृद्ध लोकांपेक्षा तरुण लोकांमध्ये अँटीबॉडीची पातळी जास्त असते. उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्ये आजार असलेल्या 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना पूर्णपणे लसीकरण केल्यानंतर 6 महिन्यांनंतर अँटिबॉडीज प्रतिसाद लक्षणीयरीत्या कमी होतो. पुरुष आणि स्त्री या दोन्ही लिंगांच्या मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना कोरोना संसर्गाचा धोका जास्त असू शकतो आणि या व्यक्तींना 6 महिन्यांनंतर बूस्टर डोससाठी प्राधान्य दिले पाहिजे, असे आभ्यासातून समोर आले आहे.

नागेश्वर रेड्डी यांच्या मते, प्रतिबंधात्मक डोससाठी 9 महिन्यांच्या अंतराचा फायदा 70% लोकसंख्येला होतो, जे 6 महिन्यांच्या पुढे पुरेशी अँटिबॉडी पातळी राखू शकतात. मात्र आपल्या देशातील प्रमाण लक्षात घेता, 30% लोक विशेषत: उच्च रक्तदाब, मधुमेह इ. सारख्या कॉमोरबिड परिस्थितींनी ग्रस्त आहेत, ज्यांना पूर्णपणे लसीकरण केल्यानंतर 6 महिन्यांनंतर संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. त्यांना बूस्टर डोससाठी देखील विचारात घेतले पाहिजे असे असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT