Virologist Dr. Kutub Mahmud टिम ईसकाळ
आरोग्य

कोरोना कायमस्वरूपी राहू शकत नाही - विषाणूशास्त्रज्ञ

लवकरच कोरोना संपेल; आपण या क्षणाच्या खुप जवळ आलोय - डॉ. कुतूब महमूद

सकाळ डिजिटल टीम

देशात कोरोना रूग्णसंख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. अशात कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी देशात योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. यासाठी लसीकरणावर अधिक भर दिला जातोय. लसीकरणामुळे कोरोना संसर्गाची वाढ कमी होण्यास मदत होणार असल्याचे विषाणूशास्त्रज्ञ डॉ. कुतूब महमूद यांनी एएनआयशी बोलताना सांगितले. कोरोना कायमस्वरूपी राहू शकत नाही आणि तो संपेल, असेही ते म्हणाले.

भारताने वर्षभरात ६० टक्के लसीकरण पुर्ण केले याविषयी डॉ. कुतूब महमूद यांनी कौतुक केले. "आपण खबरदारी म्हणून मास्क, हँड सॅनिटायझर्सचा वापर करत आहोत. आपल्याकडे लसीकरणासारखी मोठी शस्त्र आहे. कोणताही साथीचा रोग कायमस्वरूपी राहू शकत नाही आणि लवकरच कोरोना संपेल. आपण या क्षणाच्या खुप जवळ आलोय", असं डॉ. कुतूब म्हणाले.

सध्या देशात कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. सोबतच लसीकरणाचा वेगही वाढतोय. मागील वर्षाच्या तुलनेत लसीकरण झपाट्याने होत आहे. ही लस उत्पादकांसाठी मोठी उपलब्धी असल्याचेही डॉ. कुतूब महमूद म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: मार्करमने जिंकला टॉस! T20I वर्ल्ड कप फायनलनंतर पुन्हा एकदा भारत-दक्षिण आफ्रिका आमने-सामने

Cannabis Farm in Dhule: धुळ्यात सव्वा दोन एकरात गांजाची लागवड, सहा कोटींचा माल... भयानक शेती पाहून पोलीसही चक्रावले

Pune Crime : मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामूहिक अत्याचार

Sports Bulletin 8th November: नोव्हेंबरच्या अखेरीस भारत पाकिस्तान आमने-सामने ते ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानकडून २८ वर्षांनी पराभव

Smriti Mandhana नव्या संघाकडून पदार्पणासाठी सज्ज; ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर मैदान गाजवण्यासाठी उतरणार

SCROLL FOR NEXT