कोरोनाची रूग्णसंख्या जरी कमी झाली असली, तरी रोज नव्या व्हेरियंटच्या बातम्या ऐकून आपल्या मनात पाल चुकचुकतेच. आशा वेळी कोरोनाची साथ खरंच संपली का?
कोरोनाची रूग्णसंख्या जरी कमी झाली असली, तरी रोज नव्या व्हेरियंटच्या बातम्या ऐकून आपल्या मनात पाल चुकचुकतेच. आशा वेळी कोरोनाची साथ खरंच संपली का?, आपण घेतलेली लस त्यावर उपयोगी आहे का?, असे प्रश्न आपल्याला नक्की भेडसावतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या वरिष्ठ शास्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी पुणे भेटीत पत्रकारांशी संवाद साधला. त्यातून आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न....
कोरोनाची साथ खरंच संपली आहे का? नसेल तर काय काळजी घ्यावी?
डॉ. सौम्या स्वामीनाथन ः नाही. काही देशांमध्ये अजूनही कोरोनाची साथ आहे. मात्र, एवढे नक्की की लसीकरणामुळे प्रत्यक्ष रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण घटले आहे. कोरोनाचे आजवर ३०० पेक्षा जास्त सबव्हेरियंट मिळाले असून, अजूनही विषाणू सातत्याने बदल करत आहे. त्यामुळे आपल्याला सातत्याने निवडक नमुन्यांचे जनुकीय विश्लेषण करत ‘ट्रॅकिंग’ करणे गरजेचे आहे. सरकारनेही कोरोनाचा प्रसार आणि रूग्णसंख्येची नियमित देखरेख ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून साथीच्या शक्यता असल्याचे तातडीने लक्षात येईल.
नव्या व्हेरीयंटवर कोरोनाची लस खरंच परिणामकारक आहे? तिचे दुष्परिणाम होतात का?
हो नक्कीच, सर्वांनीच लसीकरणाबरोबर बूस्टर डोसही घ्यायला हवेत. कोरोना लसींबद्दल काही लोकांनी गैरसमज पसरविले असून, ते दूर करण्यासाठी आमच्या पातळीवर आम्ही प्रयत्न करत आहोत. निश्चितच लोकांचे प्रश्न खरे असले तरी त्याला शास्रीय उत्तरे द्यावे लागतील. लसींची सुरक्षितता पाहूनच जागतिक आरोग्य संघटनेने तीला परवानगी दिली आहे. लाखो लोकांना कोरोनाची लस दिल्यानंतर एक-दोघांवर लसीचे दुष्परिणाम दिसले असतील. म्हणून लाखोंचे लसीकरण थांबविणे चुकीचे आहे. दुष्परिणाम झालेल्या लोकांवर वैद्यकीय देखरेख ठेवायला हवी.
कोरोनानंतरचे आजार गंभीर आहेत का?
कोरोनामुळे केवळ श्वसनसंस्थेवर परिणाम होत नाही तर हृदयविकार, मधुमेह आदी आजारांचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनानंतरच्या आजारांसाठी सातत्याने देखरेख ठेवणे, माहिती गोळा करणे आणि त्याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे.
एमआरएनए लस उपयुक्त आहे का?
मागील ३० वर्षांपेक्षा अधिक काळ एम-आरएनए लसीवर संशोधन करण्यात येत होते. कोरोनानिमित्त प्रथमच तीचा वापर करण्यात आला असून, ती उपयोगाची ठरत आहे. निश्चितच हे तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण असून, ते मुठभर लोकांच्या हाती असू नये. जगातील सर्वांना ते मिळावे म्हणून आम्ही प्रयत्न करत आहे. येत्या काळात सर्वांना परवडेल अशा दरात लस उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
कोरोना संपल्याचे केव्हा घोषित करणार?
आजही जगभरात सात ते आठ हजार लोक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडत आहे. त्यामुळे सध्यातरी साथीचा धोका कायम आहे. त्यादृष्टीने आपण आवश्यक काळजी घ्यावी. दर तीन महिन्यांनी यासंबंधीची बैठक होते. हा आकडा कमी झाल्यास सर्वंकष आढाव्यानंतर हे घोषित करता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.