Corona Vaccination Media Gallery
आरोग्य

कोरोना लस अन् तुमच्या मनातील14 प्रश्नांची उत्तरे

नामदेव कुंभार

कोव्हिड-१९ लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. ४५ वर्षांवरच्या तसेच १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांना आता लस देण्यात येतेय. केंद्राच्या नियमावलीनुसार 'को-विन' अॅपचा लसीकरण नोंदणीसाठी वापर बंधनकारक करण्यात आली आहे. ही नोंदणी कशा प्रकारे करावी. लसीकरण केंद्र कसे मिळते, त्याबाबतची माहिती पुढील प्रमाणे

  • को-विन ॲपवरून लशीसाठी नोंदणी कशी करायची?

    https://www.cowin.gov.in/home या वेबसाइटवर जाऊन तुम्ही तुमचा फोन नंबर रजिस्टर करू शकता. त्यानंतर तुम्हाला अथवा ज्या व्यक्तींना लस घ्यायची आहे, त्यांचा तपशील भरून, त्यांचं नाव नोंदवता येईल. यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्रांमधील उपलब्ध स्लॉट्स तपासून तुमच्यासाठी एक वेळ बुक करू शकता.

  • लसीकरण केंद्र कसे मिळते

    ॲपवर नोंदणी करताना लसीकरण केंद्रांची यादी दिसते. त्यातून तुम्ही घराजवळील केंद्र निवडू शकता. सध्या १८ ते ४४ वयोगटासाठी सध्या केवळ सहाच केंद्र आहेत. त्यामुळे या गटातील नागरीकांना नोंदणी करताना, या सहा केंद्रांपैकी एका केंद्रांची निवड करता येणार आहे.

  • राज्यांना यासाठी तीन पद्धतीने नोंदणी करण्यास सांगण्यात आलंय.

आगाऊ स्वयंम नोंदणी

प्रत्यक्ष जागेवर नोंदणी

सुविधात्मक सहकारी नोंदणी

  • तुमच्या फोनवरून दुसऱ्याचे नाव नोंदवता येईल का?

    एका मोबाईलवरून स्वत:सोबत इतर ३ लोकांची लसीकरणासाठी नोंदणी करता येऊ शकते.

  • ॲनरॉइॅड मोबाईल किंवा इंटरनेट नाही, त्यांना लस कशी मिळेल?

    सरकारी रुग्णालयात ऑन-साइट नोंदणी आहे. लोक थेट लसीकरण केंद्रावर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात.

  • पहिली लस घेतली पण, दुसरी राहिली तर?

    लसीचा एक डोस घेतल्यानंतर डिजिटल प्रमाणपत्रात दिलेल्या वेळेनुसार दुसरा डोस घ्यावा लागेल. लस घेतल्यानंतर पुन्हा एक मेसेज पाठवला जाईल. पण, दुसरा डोस घ्यावाच. दुसऱ्या डोससाठी मेसेज आला नाही, तर ज्या तारखेला पहिला डोस घेतला, ती तारीख लक्षात ठेवून केंद्रावर जावे.

  • कोरोना होऊन गेल्यानंतर किती दिवसांनी लस घ्यावी?

    कोरोनामुक्त झाल्यानंतर किती दिवसांनी शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते. यामुळे किती दिवस संरक्षण मिळतं. याबद्दल अजूनही ठोस माहिती नाही. परंतु कोरोना संसर्ग बरा झाल्यानंतर ६ ते ८ आठवड्यांनी लस घेता येऊ शकते.

  • किडनी, मधुमेह, हृदयरोग असेल तर लस घेणं सुरक्षित आहे?

    लस इतर आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी सुरक्षित आहे. अशा रुग्णांना कोरोनाविरोधी लस घेण्याचे खूप फायदे आहेत. पण, लसीबद्दल प्रश्न असतील तर डॉक्टरांना विचारून शंकानिरसन करून घ्यावं

  • लस घेण्याआधी औषधं घेऊ नयेत?

    मधुमेह, किडनी आणि हृदयरोगाने ग्रस्त रुग्णांना औषध घ्यावी लागतात. लस घेण्याआधी कोणती औषधं घेऊ नयेत, याबाबत विशेष सूचना नाही. सामान्यतः सुरू असलेली औषधं घेता येऊ शकतात.

  • लस घेतल्यावर काय खबरदारी घ्यावी?

    तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक लसीचे साइट इफेक्ट असतात. लस घेतल्यानंतर केंद्रावरच काही काळ थांबावे. काही त्रास जाणवला तर, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. अथवा डॉक्टरचा सल्ला घ्यावा.

  • लस फुकट आहे की पैसे देऊन?

    सरकारी लसीकरण केंद्रांवर लस मोफत दिली जात आहे.

  • HIV ग्रस्त व्यक्ती लस घेऊ शकतात?

    एचआयव्हीग्रस्त आणि कॅन्सरची औषध घेणाऱ्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असते. पण, सद्य स्थितीत उपलब्ध असलेल्या लशींमध्ये जिवंत व्हायरस नाही. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी असणारे व्यक्ती लस घेऊ शकतात. पण, त्यांच्यासाठी लस तेवढी प्रभावी नसेल.

  • लस घेतल्यानंतर संरक्षण किती दिवस मिळेल?

    लस घेतल्यानंतर शरीरात तयार झालेली रोगप्रतिकारशक्ती किती दिवस टिकेल, हे अजूनही निर्धारित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क घालणं, हात धुणं, सोशल डिस्टंसिंगचं पालन महत्त्वाचं आहे.

  • कोरोनाविरोधी लस म्युटेट झालेल्या कोव्हिड-१९ वर प्रभावी आहे?

    नक्कीच प्रभावी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT