JN.1 Covid esakal
आरोग्य

JN.1 Covid : भारतात आढळला कोरोनाचा नवा व्हॅरिएंट! JN.1 नेमकं काय आहे? जाणून घ्या लक्षणे

कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटने आता पुन्हा डोके वर काढले आहे.

Monika Lonkar –Kumbhar

JN.1 Covid : जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना महामारीने अद्याप आपली पाठ सोडलेली नाही. २०२०-२१ मध्ये कोरोना महामारीमुळे जगभरातील असंख्य लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर, या कोरोनाचा फारसा प्रभाव दिसून आला नाही.

कोरोनाच्या केसेसचे प्रमाण ही कमी आढळून आले. परंतु, आता पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटने डोके वर काढले आहे. त्यामुळे, जगभरातील अनेक देशांची चिंता आता वाढली आहे.

ज्या देशातून कोरोनाची सुरूवात झाली होती, त्या चीनमधून कोरोनाचा एक नवा सबव्हॅरिएंट जेएन.1 (JN.1) ची अनेक प्रकरणे आढळून आली आहेत. कोरोनाचा हा नवा सबव्हॅरिएंट लक्जमबर्गमध्ये आढळून आला होता. त्यानंतर, युके, आईसलॅंड, फ्रान्स आणि अमेरिकेमध्ये या JN.1 ची प्रकरणे आढळून आली.

आता भारतातील केरळ राज्यामध्ये कोरोनाचा हा नवा JN.1 व्हॅरिएंट आढळून आल्यानंतर रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे, आता भारताची चिंता वाढली आहे. कोरोनाचा हा नवा जे-एन व्हॅरिएंट नेमका काय आहे? आणि याची लक्षणे कोणती आहेत? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

जेएन.१ काय आहे ?

सेंटर फॉर डिसिझ कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, कोरोनाचा हा नवा सबव्हॅरिएंट ओमिक्रॉन सबव्हॅरिएंट BA.2.86 च्या कुळातील आहे. ज्याला ‘पिरोला’ असे ही म्हटले जाते.

JN.1 आणि BA.2.86 या दोन्ही सबव्हॅरिएंट्समध्ये केवळ एकच फरक आहे आणि तो म्हणजे स्पाईक प्रोटिनमधील बदल होयं, असे मत अनेक शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. या स्पाईक प्रोटिनला स्पाईन म्हणून ही ओळखले जाते.

व्हायरसच्या पृष्ठभागावर हा लहान स्पाईक्सप्रमाणे दिसून येतो. त्यामुळे, लोकांमध्ये या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होताना आढळत आहे. त्यामुळे, हा विषाणू धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे.

जेएन.१ व्हॅरिएंट्ची लक्षणे कोणती?

सेंटर फॉर डिसिझ कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार या जेएन.१ ची कोणतेही खास लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे, याची लक्षणे ही कोवीड-१९ च्या अन्य व्हॅरिएंटसारखी आहेत की नाही, याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, कोरोनाच्या जेएन.१ या लक्षणांबाबत बोलायचे झाल्यास त्यात खालील लक्षणांचा समावेश आढळून येतो.

  • ताप येणे

  • लवकर थकवा येणे

  • सारखा खोकला येणे

  • सर्दीमुळे नाक बंद होणे

  • श्वास घ्यायला त्रास होणे

  • डोकेदुखी

  • अतिसार

  • सर्दी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT