After Covid Heart Diseases : डॉ. रंजन शर्मा सीनीयर कार्डिओलॉजिस्ट यांनी धक्कादायक बाब सांगितली आहे. त्यांच्या मते सध्या हृदयाच्या रोगाचे निदान आणि कारण कळणे फार कठीण होऊन बसले आहे. भारतात हृगयविकाराचे प्रमाण वाढत चालले आहे. दिवसेंदिवस लठ्ठपणा, हायपरटेंशन, मधुमेह यांसारख्या आजारांमुळे हृदयविकाराने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
मधुमेहाच्या रूग्णांचे प्रमाण वाढल्याने हायपरटेंशन आणि लठ्ठपणाच्या समस्या वाढल्या. मात्र हे नेमके वाढत्या कॅलरीजमुळे घडतंय की खराब जीवनशैलीमुळे घडतेय की स्ट्रेसमुळे हे ओळखणे कठीण होऊन बसले आहे. मात्र या समस्यांमुळे २०-५० वर्ष वयोगतील लोकांमध्ये हृदयविकारांचा धोका वाढलाय.
प्रगत देशांमध्ये आरोग्याबाबतच्या आणि व्यायामाबाबच्या जागृकतेमुळे हृदयविकाराचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढण्यामागे महत्वाचे कारण सांगायचे झाल्यास त्यांच्यात जागृकता नसणे. तेव्हा निरोगी आरोग्याबाबतची जागृकता आणि शिक्षण या गोष्टी महत्वाच्या ठरतात.
डॉक्टरांच्या मते, हेल्दी लाइफस्टाइलबाबत लहानपणापासून जागृकता निर्माण करण्याची काळाची गरज आहे. फक्त शाळा, कॉलेजेस मध्येच नाही तर कॉर्पोरेट कंपन्यांपासून ते सामान्यांपर्यंत सगळीकडे व्यायामाबाबत जागृकता असणे महत्वाचे आहे. शिवाय स्ट्रेस मॅनेजमेंटचे शिक्षण देणेही महत्वाचे आहे.
डॉ. सूर्वो बॅनर्जी (सीनियर कार्डिओलॉजिस्ट) सांगतात, भारतात संसर्गजन्य आजारच नव्हे तर असंर्गजन्य आजारसुद्धा चिंतेची बाब आहे. वाढत्या आजारांमा,गे लक्षणांकडे दूर्लक्ष करणे हे एक महत्वाचे कारण दिसून येते. शिवाय मधुमेह, हाय ब्लड प्रेशर यांसारख्या समस्या, लक्षणे वेळी न ओळखल्याने वाढत चालल्याचे दिसते.
तरुणांना पोस्ट कोविडमध्ये आर्टेरिज आकुंचन पावणे यांसारख्या समस्यांना सामारे जावे लागतेय. कोरोना व्हायरसचा परिणाम ब्लड व्हेसल्सवरसुद्धा झाल्याचे दिसून आले. ज्यामुळे आर्टेरिज ताठर झाल्यास रक्त गोठण्याचा धोका वाढतो. आणि हार्ट अटॅक येतो.
काही स्टॅटिस्टिक्समधून ३० टक्के तरुणांमध्ये आणि वयोवृद्धांमध्येसुद्धा हृदयविकाराचा धोका वाढल्याचे दिसून आले. मात्र कोरोनाचा प्रभाव सोडता एक्सरसाइज न करणे आणि कामाचा स्ट्रेस, फास्ट फूड या सगळ्यांचा परिणामसुद्धा आपल्या एकंदरित जीवनशैलीवर होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.