Curd And Raisins esakal
आरोग्य

Curd And Raisins Benefits : दही आणि मणूके एकत्र खाण्याचे भरमसाठ फायदे; एकदा खाऊन बघाच!

ठिसूळ झालेली हाडे मजबूत करण्यासाठी दही आणि मनुका खाणे हा एक जालिम उपाय आहे

सकाळ डिजिटल टीम

निसर्गाने आपल्याला निरोगी शरीर दिले आहे. ते आबाधित राखणे आजकाल खूप कठीण झाले आहे. लोकांच्या जीवनशैलीत होणारे बदल यासाठी कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळेच आजकाल लोकांना विविध प्रकारचे आजार होत आहेत.

मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे खूप सामान्य झाले आहेत. या आजारांमुळे आपल्या शरीरात इतर अनेक आजार होतात. या आजारांवर नियंत्रण ठेवणे काही कठीण काम नाही. काही सामान्य गोष्टींची घरीच काळजी घेऊन या समस्यांवर उपाय करता येतात.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका खास गोष्टीबद्दल सांगणार आहोत. ती म्हणजे, दही आणि मणुके यांच्या एका जालिम उपायाची. या उपायाच्या मदतीने हाय बीपीसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवता येते.

प्रोटीन्स आणि फायबर

दही आणि मनुका हे दोन्ही हलके पदार्थ आहेत. या पदार्थांचे एकत्र सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते. दही आणि मनुका आतड्यांसाठीही खूप फायदेशीर ठरते. दही एक प्रोबायोटिक आहे आणि मनुक्यामध्ये पाण्यात विरघळणारे फायबर असते.

हाडे मजबूत करण्यासाठी

ठिसूळ झालेली हाडे मजबूत करण्यासाठी दही आणि मनुका खाणे हा एक जालिम उपाय आहे. दह्यामध्ये पुरेसे कॅल्शियम असते, जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. मनुक्यामध्ये बोरॉन नावाचा एक विशेष प्रकारचा पोषक घटक असतो. जो व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमसह कार्य करतो. हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतो.

उच्च रक्तदाब

दही हा उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी एक चांगला उपाय आहे तर, मनुक्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे रक्तदाब वेगाने कमी होण्यास मदत होते. वाढत्या रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी दही आणि मनुका खाणे खूप फायदेशीर आहे.

साखरेचे संतुलन राखते

रक्तातील साखरेची वाढती पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दही आणि मनुका हा एक चांगला पर्याय आहे. कमी चरबीयुक्त दही हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगला पर्याय आहे. ते रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास प्रतिबंध करण्यास मदत करते.

रोगप्रतिकार शक्ती वाढवते

शरीर सतत आजारी पडू नये म्हणून वाढत्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी दही आणि मनुका खाणे चांगले. कारण याचे नियमित सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ लागते. शरीराची मजबूत रोगप्रतिकारक शक्ती संसर्ग टाळण्यास मदत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लबूशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT