Dark Chocolate During Menstruation relief from pain  
आरोग्य

Chocolate Day: मासीक पाळीदरम्यान डार्क चॉकलेट खा अन् रहा Cool

डार्क चॉकलेट हे सामान्यतः मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी ओळखले जाते. कारण त्यात कोको बीन्स असते, जे फ्लेव्होनॉइड्सचा चांगला स्रोत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मासीक पाळीचे चार दिवस म्हणजे असह्य वेदना अन् बरच काही.. ब्लोटिंग, पिरियड क्रॅम्प्स, मूड स्विंग्स यांसारख्या अनेक समस्या मासिक पाळीत उद्भवत असतात. तसेच, पायात पेटक्या येणं, कंबर दुखणे, अंगदुखी असं अनेक त्रास सहन करावे लागतात. काही महिलांची पोटदुखी इतकी जास्त असते की त्यांना झोपून राहण्याशिवाय पर्याय नसतो. हा त्रास कमी होण्यासाठी आपण काही ना काही उपाय करत असतो.

तर कधी कधी या काळात महिलांना काहीतरी गोड ख्याण्याची इच्छा होत असते. हार्मोनल बदलांमुळे गोड खाण्याची इच्छा होत असते. या काळात शरीरात कमी होणारी कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स यागोष्टीला कारणीभुत असतात. तर गोडं नेमकं काय खायंच असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. तर तुम्ही डार्क चॉकलेट खा.

डार्क चॉकलेट हे सामान्यतः मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी ओळखले जाते. कारण त्यात कोको बीन्स असते, जे फ्लेव्होनॉइड्सचा चांगला स्रोत आहे.

मागील दोन वर्षापूर्वी, NCBI च्या अभ्यासानुसार, कॉलेजमधील 28.9 टक्के महिलांनी मासिक पाळी दरम्यान चॉकलेट खाण्याची इच्छा असल्याचे कबूल केले होते. चॉकलेटची खाण्याची इच्छा मासिक पाळी येण्याच्या 4 दिवस आधी सुरू होते आणि ती संपेपर्यंत राहत असल्याचे निर्दशनात आलं आहे.

मासीक पाळीदरम्यान डार्क चॉकलेट का खावे?

मासीक पाळीदरम्यान डार्क चॉकलेट खाल्याने मन प्रसन्न राहते. चॉकलेटमध्ये सेरोटोनिन, एंटीडिप्रेसेंट असते, जे तुम्हाला आराम करण्यास मदत करते. डार्क चॉकलेटमधील फ्लेव्हनॉल मूड सुधारण्याचे काम करतो.

डार्क चॉकलेट महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान निर्माण होणारा तणाव कमी करते.

पिरियड क्रॅम्पची समस्या दूर करण्यासाठी डार्क चॉकलेट फायद्याचे आहे. महिलांना मासिक पाळीदरम्यान असह्य वेदना होतात. त्या क्रॅम्प्सवर डार्क चॉकलेट हा उत्तम उपाय आहे.

डार्क चॉकलेटमध्ये फिनॉल आणि फ्लेव्होनॉइड्ससारखे अँटिऑक्सिडंट असतात. तसेच कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, काही प्रमाणात ओमेगा -3 आणि 6 आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT