Deepika Padukone esakal
आरोग्य

Deepika Padukone : दीपिका पादुकोण गरोदरपणात करतेय विपरित करणी योगासन, कसे करायचे हे आसन? जाणून घ्या फायदे

Monika Lonkar –Kumbhar

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण सध्या तिची प्रेग्नन्सी एंजॉय करतेय. या गरोदरपणात दीपिका स्वत:ची काळजी घेत असून ती योगा करण्यावर ही भर देताना दिसत आहे. तिच्या प्रेग्नन्सीची सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसते. नुकतीच तिने सोशल मीडियावर Selfcare Month संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये दीपिकाने तिचा योगा करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. दीपिका विपरित करणी हा योगा करताना दिसतेय. या पोस्टमुळे दीपिका पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. दीपिकाने केलेले हे विपरित करणी योगासन नक्की कसे करायचे? ते गरोदरपणात केल्याने काय फायदे होतात? चला तर मग जाणून घेऊयात.

दीपिका करतेय विपरित करणी योगासन

दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलयं की, 'हा महिना स्वत:ची काळजी (Self Care Month) घेण्याचा महिना आहे. मला चांगली कसरत करायला आवडते. मी चांगले दिसण्यासाठी नाही तर फिट राहण्यासाठी व्यायाम करते. मागील कित्येक दिवसांपासून व्यायाम हा माझ्या दैनंदिन दिनक्रमाचा एक भाग झाला आहे.

मात्र, जेव्हा मला व्यायाम करता येत नाही, तेव्हा मी पाच मिनिटे या साध्या योगासनाचा सराव करते. वर्कआऊट असो वा नसो, मी हे योगासन रोज करते. जेव्हा तुम्ही विमानाने प्रवास करून येता, तेव्हा केवळ तणाव कमी करण्यासाठी हे योगासन फायदेशीर आहे. तुम्ही सर्वजण माझ्यासोबत रोजच्या सेल्फ केअर सरावामध्ये देखील सहभागी होऊ शकता.

दीपिकाने तिच्या पोस्टमध्ये पुढे म्हटलयं की, विपरित करणी योगासन करताना योगा मॅटवर पाठीवर झोपा. त्यानंतर, भिंतीचा आधार घेऊन तुमचे पाय सरळ ठेवा. त्यानंतर, तिने म्हटलंय की, संस्कृतमध्ये ‘विपरित’ म्हणजे  उलटा आणि ‘करणी’ म्हणजे कृतीत आणणे.

पुढे ती म्हणतेय की, या योगासनात पाय भिंतीला टेकून झोपल्याने तुमच्या मानसिक अन् शारिरीक आरोग्याला याचा फायदा होऊ शकतो. तसेच, तुमची मज्जासंस्था योग्यरित्या कार्य करते आणि तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

दीपिकाने पुढे पोस्टमध्ये म्हटलयं की, हे एक प्राचीन योगासन आहे. जे खास करून रोजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनात आपल्या सर्वांसाठी खूप फायदेशीर आहे. या पोस्टच्या शेवटी दीपिकाने स्पष्टपणे लिहिलंय की, हे योगासन करण्यापूर्वी तुमच्या योग प्रशिक्षकाचा किंवा कोणत्याही आरोग्य तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्या.

हे योगासन कोणी करू नये?

दीपिकाने तिच्या पोस्टमध्ये हे योगासन कोणी करू नये? याबद्दल पोस्टमध्ये लिहिलयं की, ज्यांना ग्लूकोमा आहे किंवा ज्यांचा बीपी खूप जास्त आहे, त्यांनी हे योगासन करणे टाळावे. तसेच, गरोदर महिलांनी हे योगासन करण्यापूर्वी योग तज्ज्ञाचा आणि डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. त्यानंतर, हे योगासन करावे.

विपरित करणी योगासन केल्याने काय फायदे होतात?

  • गरोदरपणात हे योगासन करण्यापूर्वी सर्वात आधी तुमच्या योग तज्ज्ञाचा किंवा डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या.

  • गरोदरपणात हे योगासन केल्याने शरीरातील स्नायू आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.

  • तसेच, दोन्ही पायांची आणि घोट्याची सूज कमी होण्यास मदत होते.

  • गरोदरपणात हे योगासन केल्याने पाठीच्या खालच्या भागावर कमी दाब जाणवतो तसेच, पाय आणि नितंबांमध्ये जडपणा आणि थकवा कमी प्रमाणात जाणवतो.

  • गरोदरपणात हे योगासन केल्याने पायांची सूज आणि घोट्याची सूज आणि अस्वस्थता देखील कमी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon : महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू

NIA Raid : ‘एनआयए’चे देशभर २२ ठिकाणी छापे; संशयास्पद साहित्य जप्त, राज्यामध्येही कारवाई

Narendra Modi : ‘काँग्रेस’चा विचारच परदेशी; वाशीमच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा घणाघात

Rahul Gandhi : आरक्षण मर्यादा वाढवणारच! कोल्हापुरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा निर्धार

Calcutta Crime : पश्चिम बंगाल पुन्हा हादरले! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून

SCROLL FOR NEXT