Dehydration In Winter esakal
आरोग्य

Dehydration In Winter : सावधान! हिवाळ्यात कमी पाणी पिणं ठरू शकतं

डिहायड्रेशन म्हणजेच शरीरात पाण्याच्या कमतरतेचे अनेक दुष्परिणाम

सकाळ डिजिटल टीम

Dehydration In Winter : डिहायड्रेशन म्हणजेच शरीरात पाण्याच्या कमतरतेचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. सहसा उन्हाळ्यात, कडक उन्हात शरीराला जास्त घाम येतो आणि या प्रमाणात आपण पाणी कमी पितो, अशात डिहायड्रेशनचा धोका सर्वाधिक असतो. पण तुम्हाला माहित आहे का की या हिवाळ्यातही शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते?

आरोग्य तज्ञांच्या मते, हिवाळ्यात लोक सहसा पाणी कमी पितात, ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. थंड हवामानात, तहानच कमी लागते आणि शरीराची पाण्याची गरज पूर्वीसारखीच राहते. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, प्रत्येक ऋतूमध्ये सर्व लोकांनी दररोज 3-4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

न्यू हॅम्पशायर विद्यापीठाच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की थंडीच्या महिन्यांत डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते आणि हे उन्हाळयाहूनही हानिकारक आहे. कमी तापमानात जड कपड्यांच्या वजनाखालीही शरीराला जास्त मेहनत करावी लागते.

थंड, कोरड्या हवेत घामाच लवकर बाष्पीभवन होत. याशिवाय काही परिस्थितींमुळे सर्दीमध्ये डिहायड्रेशन होऊ शकते, ज्यामध्ये कॉफी आणि चहाचे अतिसेवन सुद्धा आहे. कॉफी एक लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ मानली जाते, ज्यामुळे शरीरात निर्जलीकरण होण्याचा धोका असू शकतो.

डिहायड्रेशनमुळे अशा समस्या उद्भवू शकतात

उन्हाळ्यातील डिहायड्रेशनप्रमाणे, हिवल्यातील डिहायड्रेशनमुळेही अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. त्याची लक्षणे वेळीच ओळखणे आवश्यक आहे. वाढलेली तहान, वारंवार कोरडे तोंड, कोरडी त्वचा, थकवा आणि चक्कर येणे ही डिहायड्रेशनची कारण असू शकतात.शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे, काही परिस्थितींमध्ये, ताप, स्नायू क्रॅम्प, त्वचा कडक होणे इत्यादी गंभीर आजार देखील होऊ शकतात.

मधुमेह आणि इतर जुनाट आजार असलेल्या लोकांना डॉक्टर अनेकदा पाणी पिण्याचा सल्ला देतात. दीर्घकाळापर्यंत किंवा वारंवार डिहायड्रेशनमुळे मूत्रमार्गात संक्रमण (यूटीआय), अगदी मूत्रपिंड निकामी होऊ शकतात. याशिवाय डिहायड्रेशन झाल्यास ब्लडप्रेशर कमी होण्याचा धोका जास्त असतो, ही गंभीर समस्या मानली जाते.

हिवाळ्यात हायड्रेशनची काळजी घ्या

- थंड वातावरणातही हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच इतर काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही समस्या टाळू शकता.

- सतत पाणी प्या. व्यायामानंतर हायड्रेशनची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे असते.

- तुम्हाला कधी पाणी पिण्याची गरज आहे याची यादी बनवा आणि कमी प्रमाणात पाणी प्या.

- फळे आणि भाज्यांचे सेवन करा, ज्यामुळे शरीराला पोषक तत्वांसह पाणी मिळते.

- कॉफी-चहाचे सेवन मर्यादित प्रमाणात करा, कारण त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT