Delhi : दिल्लीच्या सर गंगा राम रुग्णालयातील शस्त्रक्रिया तज्ञांनी महिलाच्या नितंबात तीन वर्षांपासून अडकलेली सुई यशस्वीरित्या बाहेर काढली आहे. ही सुई 2021 मध्ये शिलाई करताना महिला चुकून बसल्यावर तिच्या नितंबाच्या मांसपेशींमध्ये घुसली होती.
घटनेची माहिती देताना रुग्णाने सांगितले की, "शिलाई करताना थोडा वेळ सुई एका बाजूला ठेवली होती. परत येऊन बसल्यावर मला जोरदार काहीतरी टोचल्यासारखे वाटले. त्यावेळी सुई मोडली आणि तिचा एक तुकडा गायब झाला. आम्ही खूप शोधला पण तो सापडला नाही. मला वाटले होते तो कदाचित खोलीतच कुठे तरी पडला असेल. पण गेल्या तीन वर्षात माझ्या शरीरात होता."
रुग्ण महिलेने पुढे सांगितले, "तीन वर्षात मी अनेक डॉक्टरांना दाखवले. त्यांनी वेदना कमी करण्यासाठी औषधे दिली पण त्रासाचे मूळ कारण ओळखू शकले नाहीत.अलीकडेच केलेल्या X-ray मध्ये धक्कादायक खुलासा झाला 'गायब' झालेली सुई मांसपेशींमध्ये इतक्या दिवसात अडकली होती."
सुई काढून टाकण्यासाठी तिने अनेक शस्त्रक्रिया तज्ञांशी संपर्क साधला. परंतु सुई खोलवर असल्याने आणि जवळच्या नसांना इजा होण्याचा धोका असल्याचे सांगून सर्वांनी टाळाटाळ केली. अखेर ती सर गंगा राम रुग्णालयाच्या सामान्य शस्त्रक्रिया विभागातील सीनियर कन्सल्टंट डॉ. तरुण मित्तल यांच्या भेटीला गेली.
काळजीपूर्वक तपासणी आणि ऑपरेशनपूर्वीच्या इमेजिंग नंतर, डॉ. मित्तल आणि त्यांच्या टीमने अतिशय जटिल शस्त्रक्रियेची योजना आखली. शस्त्रक्रियेदरम्यान, मांसपेशींच्या तंतुमध्ये सुई नेमके कुठे आहे ते शोधण्यासाठी त्यांनी विशेष सी-आर्म इमेजिंग उपकरणाचा वापर केला.
डॉ. मित्तल म्हणाले, "ही एक आव्हानात्मक शस्त्रक्रिया होती. सुईचे नेमके स्थान निश्चित करण्यासाठी ऑपरेशन दरम्यान अनेक X-रे घेणे घ्यावे लागले होते."
काळजीपूर्वक सुईच्या आजूबाजूचे ऊतक काढून टाकल्यानंतर, जोखीम असूनही सुई एका तुकड्यात बाहेर काढण्यात टीम यशस्वी झाली.आभार मानत रुग्ण महिलेने कृतज्ञता व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.