Dengue Disease esakal
आरोग्य

Dengue Disease : लहान मुलांचा डेंग्यूपासून असा करा बचाव, ‘या’ टिप्सच्या मदतीने घ्या खास काळजी

Dengue Disease : पावसाळ्यात डास आणि पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

Monika Lonkar –Kumbhar

Dengue Disease : सध्या देशातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून, काही राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. पावसाळा आला की, उकड्यापासून दिलासा तर मिळतोच शिवाय, विविध आजारांचा धोका ही वाढतो. पावसाळ्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

पावसाळ्यात डास आणि पाण्यामुळे पसरणारे आजार आणि संसर्गाचा धोका वाढतो, शिवाय, या दिवसांमध्ये लहान मुले आणि वयोवृद्धांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे, त्यांना या आजारांचा धोका अधिक असतो. डेंग्यू या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरतो. डासांमुळे पसरणारा हा आजार धोकादायक आहे.

हा आजार टाळण्यासाठी वेळीच योग्य उपचार आणि विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. लहान मुले या आजाराल सहज बळी पडतात. त्यामुळे, डेंग्यूसह इतर आजारांपासून त्यांचा बचाव करण्यासाठी खास काळजी घेणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. त्यांच्या मदतीने तुम्ही लहान मुलांचा डेंग्यूपासून बचाव करू शकता.

डासांची पैदास रोखा

डेंग्यू हा आजार डासांपासून पसरतो. त्यामुळे, या दिवसांमध्ये डासांची पैदास रोखणे गरजेचे आहे. हे एडिस डास प्रामुख्याने साचलेल्या पाण्यात वाढतात. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये घरामध्ये किंवा घराच्या आसपास डासांची उत्पत्ती होऊ नये, याची काळजी घ्या.

घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्या बदला. त्यातील पाणी काढून टाका. तसेच, टाकून दिलेल्या टायरमधील साचलेले पाणी ताबडतोब काढून ते स्वच्छ करा.

मुलांना पूर्ण बाह्यांचे कपडे घाला

लहान मुलांचा डेंग्यापासून बचाव करायचा असेल तर, डास चावण्यापासून त्यांचे संरक्षण करणे, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी शक्य तितके पूर्ण बाह्यांचे कपडे आणि फूल पॅंट मुलांना घालायला सांगा. जर तुम्ही मुलांना घेऊन प्रवास करणार असाल तरी त्यांनी फूल स्लीव्ह्ज, फूल पॅंट आणि बंद पायांचे शूज घातले आहेत ना याची खबरदारी अवश्य घ्या.

डास प्रतिबंधकांचा वापर करा

सर्वात आधी तर तुमच्या मुलांना शक्य तो संपूर्ण अंग झाकणारे कपडे घालायला द्या. जेणेकरून डास चावणार नाहीत. तसेच, डास चावण्याचा धोका कमी करण्यासाठी उघड्या त्वचेवर Mosquitoes Repellents चा वापर करा. हे repellent खास लहान मुलांसाठी बनवलेले असतील तरच ते खरेदी करा. याची नीट खात्री करूनच ते खरेदी करण्यावर भर द्या. तसेच, त्यावरील सूचना काळजीपूर्वक वाचा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

Women’s Asian Champions Trophy: भारतीय महिलांचे वर्चस्व कायम; चीनवर ३-० मात करत ग्रुपमध्ये अव्वल

Paranda Assembly Election : मतदानाच्या दिवशी कोणीही 'चप्पल' घालून प्रवेश केल्यास कारवाईची मागणी; अपक्ष उमेदवाराची अनोखी तक्रार

SCROLL FOR NEXT