Diabetes  esakal
आरोग्य

Diabetes च्या रूग्णांसाठी 10 बेस्ट ड्रिंक ऑप्शन्स, रोज प्या अन् कायम ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवा

मधुमेहाच्या रूग्णांनी रोज सकाळी हे १० हेल्दी ड्रिंक ऑप्शन्स त्यांच्या डाएटमध्ये अॅड केल्यास तुमचे दिवसभर शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहील

साक्षी राऊत

Diabetes : मधुमेहाच्या रूग्णांना आरोग्याची विशेष काळजी असते. अशा वेळी आपलं ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांना त्यांच्या खाण्यापिण्याचीही विशेष काळजी घ्यावी लागते. तेव्हा मधुमेहाच्या रूग्णांनी रोज सकाळी हे १० हेल्दी ड्रिंक ऑप्शन्स त्यांच्या डाएटमध्ये अॅड केल्यास तुमचे दिवसभर शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहील.

फॅट टू स्लिमच्या डायरेक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आणि डायटीशियन शिखा अग्रवाल शर्मा आपल्याला काही घरघुती ड्रिंक्सबाबात सांगत आहेत जे मधुमेहाचे रूग्ण बिनधास्त पिऊ शकतात. महत्वाची बाब म्हणजे हे ड्रिंक पिऊन तुमंच शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहातं आणि बऱ्याच गंभीर आजारांपासूनही तुम्ही दूर राहाता.

शुगर कंट्रोलसाठी हे ड्रिंक प्या

नारळ पाणी प्या

नारळ पाणी हे नॅचरल आणि सर्वोत्तम ड्रिंक आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर ठरते. पोटॅशियम, इलेक्ट्रोलाइट्स, बी जीवनसत्त्वे, अमीनो ऍसिड इत्यादींसह पोषक आणि मिनरलयुक्त नारळाच्या पाण्यात कॅलरीज कमी असतात. रक्तातील साखर राखण्याव्यतिरिक्त ते पचनशक्ती, त्वचेचे आरोग्य आणि प्रतिकारशक्ती सुधारते.

Coconut Water

ताक

ताक सर्वोत्तम डेअरी प्रोडक्टपैकी एक आहे त्यात साखर मिसळण्याची गरज नाही. त्याची टेस्ट वाढवण्यासाठी जिरे, आले, धणे इत्यादी घटक त्यात टाका. असे केल्याने या पेयाचे पौष्टिक मूल्य आणखी वाढते.

गव्हाच्या कुड्या

गव्हाच्या कुड्यांमध्ये जीआई इंडेक्स कमी असतो ते मधुमेहाच्या रूग्णांसाठी फार फायदेशीर मानले जाते. मधुमेहाच्या रूग्णांसाठी गव्हाच्या कुड्यांचे पाणी फायदेशीर ठरते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी ते फायदेशीर ठरते.

कारल्याचा ज्यूस

मधुमेहाच्या रुग्णांना फळांचे रस न पिण्याचा सल्ला दिला जातो, परंतु हा नियम भाजीपाल्यांच्या रसांना लागू होत नाही. साखरेच्या रुग्णांसाठी कारल्याचा किंवा करवंदाचा रस उत्तम आहे. या भाजीमध्ये अशी संयुगे असतात जी रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यात फॅट, कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाणही कमी असते. (Diabetes)

आवळ्याचा रस

मधुमेहाच्या रुग्णांसाठी आवळा हा उत्तम पर्याय आहे. यात कमी GI (ग्लायसेमिक इंडेक्स) देखील आहे आणि व्हिटॅमिन सी देखील भरपूर आहे. आवळ्यामध्ये क्रोमियम हे खनिज असते जे कार्बोहायड्रेट चयापचय नियंत्रित करते. हे इन्सुलिन आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. याशिवाय तुम्ही मेथीचे पाणी, दालचिनीचे पाणी, ग्रीन टी आणि हळदीचे पाणी पिऊ शकता. या सर्व गोष्टी मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. (Health)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

SCROLL FOR NEXT