Diabetes Warning Signs esakal
आरोग्य

Diabetes Warning Signs : शुगर लेव्हल वाढल्याने स्किन वर होऊ शकतात परिणाम

डायबिटीस असा आजार आहे जो एकदा झाला की आयुष्यभर राहतो

सकाळ डिजिटल टीम

Diabetes Warning Signs : सध्याच्या धावत्या जगात सगळ्यांच आपल्या फिजिकल फिटनेस कडे, आपल्या डाएट कडे लक्ष असतच अस नाही, खूप कमी लोकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत, अशातच डायबिटीसचा धोका संभावतो.

डायबिटीस असा आजार आहे जो एकदा झाला की आयुष्यभर राहतो. डायबिटीस झालेल्या सगळ्यांना खूप त्रासांना सामोरे जावे लागते; जसे की, सतत वॉशरूमला जायला लागण, खूप भूक लागण, तहान लागणं, वजन एकदम वाढणं किंवा कमी होणं, हाता पायांना मुंग्या येण; पण या सगळ्यापेक्षाही खूप वाईट परिणाम होतो तो आपल्या त्वचेवर.

जगभरात डायबिटीसचा धोका वाढतो आहे; त्यामुळे त्याबद्दलची भीतीही वाढते आहे. डायबिटीस कोणालाही होऊ शकतो. भारतात जवळ जवळ ७.७ करोड लोकं डायबिटीस ग्रस्त आहेत. तज्ञांचा असा अनुमान आहे की २०४५ पर्यंत ही संख्या १३ करोड पर्यंत जाईल.

डायबिटीसची सुरुवातीची लक्षण कळली तर आपण यावर प्रतिबंध करू शकतो; जर तुम्हाला सतत स्किन प्रॉब्लेम होतो आहे तर हे लक्षण डायबिटीसचही असू शकत.

१. त्वचा सुजणे- हे बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे होऊ शकते, याने त्वचेला जळजळ होते ज्यामुळे तुमची त्वचा खूप सुजते आणि लाल होते. याशिवाय बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनचा सुद्धा खूप त्रास सहन करावा लागतो.

२. पुरळ आणि फोड येणे - डायबिटीसच्या लोकांमध्ये फंगल इन्फेक्शन येणे, पुरळ येणे हे खूप कॉमन आहे. या इन्फेक्शन मुळे, तुम्हाला त्वचेवर पुरळ आणि बारीक फोड येयला सुरू होतात, दोन बोटांच्या मध्ये, योनीमार्गात याचे प्रमाण जास्त आहे आहे.

३. सतत खाज सुटणे - डायबिटिसच्या माणसांना हा त्रास होतच असतो; त्वचा कोरडी पडू लागते त्यातली नरिशमेंट संपते आणि सतत खाज सुटते.

४. त्वचा काळी पडणे - आपल्या त्वचेचा मूळ रंग बदलून तिचा रंग काळसर किंवा तपकिरी होऊ लागतो; याला अकॅन्थोसिस निग्रिकन्स म्हणतात. हे डाग मानेवर, कंबरेवर, हातात, कोपऱ्यावर आणि गुडघ्यावर दिसतात.

५. डायबेटिक अल्सर- जरी ही समस्या अगदी दुर्मिळ आहे, तरी ज्या रुग्णांना आधीच डायबिटीसचा त्रास असेल तर त्यांना अल्सर होऊ शकतो. न्यूरोपॅथीचा त्रास आहे त्यांना मधुमेहाचे फोड येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Vikhe Patil Won Shirdi Assembly Election 2024 final result live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपाचे उमेदवार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना ५१७८ मतांची आघाडी घेतली

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT