Glasses Protect The Eyes : निळ्या प्रकाशापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी चष्मा खरोखर प्रभावी आहे का? मोनाश युनिव्हर्सिटी, सिटी युनिव्हर्सिटी आणि मेलबर्न विद्यापीठाच्या टीमने यावर संशोधन केलं. त्यांना मिळालेले निष्कर्ष अतिशय धक्कादायक होते. मात्र या संशोधनात केवळ प्रौढांचा समावेश करण्यात आला होता, त्यामुळे मुलांसाठी ते प्रभावी आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कॉम्प्युटर वापरताना निळा प्रकाश तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहोचण्यापासून रोखणारा चष्मा घातल्याने डोळ्यांचा ताण कमी होतो, तुमची झोप सुधारते आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते. तुम्ही ते स्वतः जाऊन ते विकत घेऊ शकता किंवा तुमचे ऑप्टोमेट्रिस्ट तुमच्यासाठी ते लिहून देऊ शकतात. पण ते खरोखर फायदेशीर आहेत की त्यामुळे तुमचं नुकसान होतंय?
मेलबर्न युनिव्हर्सिटीच्या टीमने मोनाश युनिव्हर्सिटी आणि सिटी, युनिव्हर्सिटी लंडनमधील सहकाऱ्यांसह, संबंधित अभ्यासाचे सर्वेक्षण करून चष्मा निळा प्रकाश फिल्टर करू शकतो का हे पाहण्याचा प्रयत्न केला. त्यातून जो निकाल आला तो अतिशय धक्कादायक होता. निळ्या प्रकाशापासून संरक्षण करण्याचा दावा करणारे चष्मे प्रत्यक्षात काम करत नाहीत, असे संशोधनातून समोर आले आहे.
निळा प्रकाश म्हणजे काय
आपल्या वातावरणात निळा प्रकाश सर्वत्र आहे. त्याचा मुख्य स्त्रोत सूर्य आहे. याशिवाय, घरातील सर्व प्रकाश उपकरणे निळ्या प्रकाशाचे स्त्रोत आहेत. यामध्ये एलईडी आणि डिजिटल उपकरणांच्या स्क्रीनचा समावेश आहे, जे वेगवेगळ्या प्रमाणात प्रकाश उत्सर्जित करतात. उपकरणांचा निळा प्रकाश सूर्याच्या तुलनेत खूपच कमी असतो, तो आपल्याला अधिक हानी पोहोचवतो कारण तो आपल्या जवळ असतो आणि आपण त्यावर जास्त वेळ घालवतो.
संशोधनाचा परिणाम
टीमने सहा देशांतील 619 प्रौढांवर संशोधन केले आणि त्यांच्यावर 17 वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात असे आढळून आले की निळ्या प्रकाश-फिल्टरिंग लेन्सचा वापर केल्याने कोणताही फायदा होत नाही. या संशोधनात दोन तासांपासून ते पाच दिवसांच्या कालावधीत डोळ्यांवरील ताणाचे मूल्यांकन करण्यात आले.
झोपेवर होणारे परिणाम
निळ्या प्रकाश फिल्टरिंग लेन्समुळे निद्रानाशाचा त्रास बंद होऊन झोपेची गुणवत्ता सुधारू शकते की नाही यासाठी सहा अभ्यास करून मूल्यांकन करण्यात आलं. या अभ्यासांमध्ये निद्रानाश आणि द्विध्रुवीय विकार यासह विविध वैद्यकीय स्थिती असलेल्या लोकांचा समावेश करण्यात आला. अभ्यासात निरोगी प्रौढांचा समावेश करण्यात आला नाही. या अभ्यासात असं आढळून आलं की याचा झोपेवरही काही परिणाम होत नाही.
चष्मा घालण्याचे दुष्परिणाम
काही अभ्यासांनी सांगितलंय की, चष्मा घातल्याने अभ्यासातीलसहभागींना डोकेदुखी, वाईट मूड आणि अस्वस्थता होते. जे लोक साध्या लेन्सचा चष्मा वापरतात त्यांनाही हेच परिणाम दिसून आलेत.हा अभ्यास मर्यादित कालावधीसाठी करण्यात आल्यामुळे त्याच्या व्यापक परिणामाची माहिती मिळू शकली नाही. हे स्पष्ट आहे की लेन्सची प्रभावीता आणि सुरक्षितता वेगवेगळ्या वयोगटातील आणि आरोग्य परिस्थितीनुसार बदलू शकते. रिसर्च टीमच्या म्हणण्यानुसार, डोळ्यांवर ताण किंवा इतर समस्या असल्यास, तुमच्या ऑप्टोमेट्रिस्टशी नक्कीच चर्चा करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.