तुमच्या मुलांसोबतचे तुमचे नाते मजबूत करण्यासाठी या टिप्स फॉलो करा.  esakal
आरोग्य

Parents Bonding with Child : आजच्या काळात पालकत्वाची शैली आणि सकारात्मक पालकत्व खूप महत्वाचे ; डॉ. मलिहा साबळे

मुलांशी चांगले नाते मानसिक आरोग्यासाठी, कुटुंबातल्या चांगल्या वातावरणासाठी गरजेचे

सकाळ डिजिटल टीम

Parenting : मुलांशी नाते अधिक चांगल्या पद्धतीने तयार करणे आईच्या आणि बाबांच्याही मानसिक आरोग्यासाठी आणि कुटुंबातल्या चांगल्या वातावरणासाठी किती महत्त्वाचे असते हे आपण गेल्या आठवड्यात बघितले. आजच्या काळात पालकत्वाची शैली आणि सकारात्मक पालकत्व खूप महत्वाचे आहे.

जेव्हा पालकत्वाचा विचार केला जातो, तेव्हा ढोबळमानाने विचार केला जातो. मुले जसजशी वाढतात, तसतसे पालकही बदलतात आणि जुळवून घेतात. तथापि, काही सोप्या सकारात्मक पालक टिप्सचे पालन करणे आपल्या मुलाशी असलेल्या नातेसंबंधाच्या बाबतीत मदत करू शकते. (How to develop good relations with child)

प्रेमळ संवाद

संवादाच्या प्रत्येक संधीला तुमच्या मुलाबरोबर कनेक्ट होण्याची संधी म्हणून पहा. आपल्या अभिव्यक्तींमध्ये मायाळूपणा ठेवा, मुलांशी डोळ्यांनी संपर्क करा, स्मित करा आणि परस्परसंवादाला प्रोत्साहन द्या.

सीमा, नियम आणि परिणाम

मुलांना सीमारेषा आखून देणे, नियम ठरवणे आणि मार्गदर्शन आवश्यक आहे. तुमच्या मुलांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे त्याबद्दल बोला आणि त्यांना समजेल याची खात्री करा.

सहानुभूती दाखवा

तुमच्या मुलाच्या भावना जाणून घ्या. त्यांना तुम्ही समजून घेत आहात हे जाणवून द्या. त्यांना जेव्हा जेव्हा समस्या येतात तेव्हा तुम्ही त्यांना मदत करण्यासाठी तेथे आहात याची खात्री द्या. विशेषतः काही विशिष्ट प्रसंगांमध्ये मुलांना तुमची, तुमच्या सल्ल्याची, दिलाशाची आणि प्रेमाची गरज असते. ते क्षण गमावू नका. समस्या सोडवण्यात तुम्ही मुलांना योग्य प्रकारे मदत करता, तेव्हा काही प्रसंगी तीही तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींद्वारे मदत करतात आणि त्यातून तुमचे नाते अधिक दृढ, सकारात्मक बनते.

समस्या सोडवणे

आपल्या मुलाला समस्या सोडवण्यास मदत करा. एक चांगले ‘आयडॉल’ बना आणि तुमच्या स्वतःच्या कृतीतून त्यांना कसे वागावे ते दाखवून द्या. तुम्ही तुमच्या मुलांसोबत उपाय शोधण्यासाठी काम करता, तेव्हा ते अडचणींना योग्य मार्गाने कसे सामोरे जायचे ते शिकतात. लक्षात ठेवा, ही गोष्ट परस्परपूरकही असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

ACMC Solar Holding : एसीएमसी सोलर होल्डिंग्सच्या आयपीओकडून गुंतवणुकदारांची निराशा, शेअर्स 13% डिस्काउंटवर लिस्ट...

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

SCROLL FOR NEXT