ginger  sakal
आरोग्य

Disadvantage Of Ginger: जसं नाण्याला दोन बाजू तसचं आल्याचे फायदे अन् तोटेही आहेत बरं... जास्त सेवन असू शकते हानिकारक

आल्याचा अतिवापर केल्यास आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.

Aishwarya Musale

आज आम्ही अशाच एका औषधी वनस्पतीबद्दल बोलत आहोत ज्याचा वापर जवळपास प्रत्येक घरामध्ये केला जातो, मग ते चहाच्या चवीसाठी असो किंवा जेवणाच्या चवीसाठी, आल्याचे असणे सर्वात महत्वाचे मानले जाते.

पण ते जेवणाची चव तर वाढवतेच, पण त्यात असलेले चांगले गुणधर्म शरीराला अनेक फायदे मिळवून देण्यासही मदत करतात.

आले हे एक प्रकारचे औषध आहे जे चहामध्ये मिसळून प्यायल्याने सर्दी दूर होते. पाण्यात मिसळून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि वजन नियंत्रणात राहते. पण ते म्हणतात की प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात.

अगदी अद्रकाबाबतही तेच आहे. आल्याचा अतिवापर केल्यास आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला आल्याच्या अतिसेवनाचे तोटे सांगत आहोत.

आल्याचे सेवन केल्याने होणारे तोटे

गर्भधारणा

जर तुम्ही गर्भवती असाल किंवा गर्भधारणेची प्लॅनिंग करत असाल, तर आल्याचे जास्त सेवन करणे टाळा. आल्याचा प्रभाव उष्ण असतो. गरोदरपणात आले जास्त खाल्ल्याने गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो.

मधुमेह

आल्याचे अतिसेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हानिकारक ठरू शकते. विशेषत: जेव्हा तुम्ही मधुमेहाची औषधे घेत असाल, तेव्हा जास्त प्रमाणात आले खाणे धोकादायक ठरू शकते.

Ginger

स्किन

जर तुम्ही त्वचेशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल किंवा तुमची त्वचा संवेदनशील असेल तर आले मर्यादित प्रमाणात खाणे फायदेशीर ठरू शकते. आल्याचे जास्त सेवन केल्याने डोळे लाल होणे, खाज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत जळजळ होणे, डोळ्यांना खाज येणे आणि घशाचा त्रास होऊ शकतो.

पोटासाठी असते वाईट

आल्याचे जास्त सेवन केल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. खरं तर, यामुळे पोटात जळजळ आणि पोट खराब होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

आपापल्या उमेदवारांसाठी ‘हे’ १७ बडे नेते सोलापुरात! पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, योगी, रेवंथ रेड्डी, सिद्धरामय्या, उद्धव व राज ठाकरे, ओवैसी यांच्या प्रचारसभा, वाचा...

कौटुंबिक वारसा जपताना...

SCROLL FOR NEXT