अनेकजणांना दिवसा झोपायची सवय असते.अनेकजण घरकाम आटोपल्यानंतर दिवसाची झोप घेतात तर काही थकवा नाहीसा करण्यासाठीही दिवसा झोपतात. पण तुम्हाला माहिती आहे का दिवसा झोपायची सवय आपल्यासाठी चांगली आहे की वाईट? चला तर जाणून घेऊया.
डॉक्टर सहसा दिवसा झोपणे चुकीचं असल्याचं सांगतात. पण अनेकदा रात्रीची अपुर्ण झोप झाल्याने दिवसा झोप येते. पण आयुर्वेदानुसार दिवसा झोपणे चुकीचं आहे.
अनेक शारिरीक आजार निर्माण होण्याची शक्यता वाढते. कफ पित्त्यांचा त्रास असणाऱ्या लोकांनी दिवसा कधीही झोपू नये.
सोबतच लठ्ठ किंवा जास्त वजनाने ग्रस्त असलेल्या लोकांनीही दुपारचे झोपणे टाळावे. यामुळे वजन वाढण्याची शक्यता आणखी वाढते.
एवढंच काय तर दिवसा झोपल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि शरीरात सुस्ती येते त्यामुळे शरीरात आळसपणा येतो.
आयुर्वेदानुसार दिवसा झोपण्यापेक्षा दुपारची १५ मिनिटांची झोप शरिरासाठी चांगली असते. पण त्यापेक्षा जास्त वेळ कधीच झोपू नये.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.