does lukewarm water really reduce weight know the facts  
आरोग्य

Weight Loss: गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतंय का? काय सांगतो अभ्यास

सकाळ डिजिटल टीम

सध्याची बिझी लाईफस्टाईल, अवेळी जेवण करणं, धावपळ, कामांमुळं बदलती जीवनशैली यासर्वांमुळं बहुतांशजणांना वजन वाढीच्या समस्येला सामोर जावं लागतयं. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेकजण योगा, जिम, विविध आर्युवेदिक उपाय, यांसारखं मार्ग अवलंबताना दिसतात. तर अनेकजण वाढलेलं वजन पाहून रोज सकाळी गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात. काहीजण हा दिलेला सल्ला आजमावूनदेखील पाहतात.

खरतंर आपण सर्वांनी गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे वाचले आहेत. गरम पाणी पिल्याने पचनसंस्था सुधारते, ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती सुधारते आणि रोगांपासून तुमचे रक्षण होते. तसेच या पाण्याचे रोज सकाळी सेवन केल्यानं तुमच्या त्वचेलाही फायदा होतो आणि वजनही कमी होते. विशेषतः कोमट पाणी पिल्याने वजन कमी किंवा पोटाची चरबी वितळते असा दावा अनेकाजण करताना दिसतात.

तर जाणून घेऊया गरम पाण्याचे फायदे?

गरम पाण्याने केवळ चरबी जळत नाही तर शरीराला चांगले हायड्रेट ठेवण्यासाठी गरम पाणी उपयुक्त ठरते. चहा-कॉफी सारख्या कॅलरी पेयांपेक्षा गरम पाण्याची निवड ही उत्तम आहे.

डॉ. वंशिका भारद्वाज, मरेंगो एशिया हॉस्पिटल, गुरुग्राम, यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे.

गरम पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील चरबीचे रेणू अधिक कार्यक्षमतेने नष्ट होण्यास मदत होते. ज्यामुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते. मात्र, पाणी पिताना अधिक गरम तर नाही ना याची दक्षता घेणं गरजेचं असतं. त्यामुळं कोमट पाणी हे फायद्याचे ठरते असे मत डॉक्टर भारद्वाज यांनी व्यक्त केलं आहे.

डॉ.भारद्वाज म्हणाले की, चांगल्या परिणामांसाठी सकाळी उठल्याबरोबर आणि जेवणापूर्वी गरम पाणी प्या. पाण्याचे तापमान सुमारे 50 अंश सेल्सिअस असावे. आंघोळीपूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने तुमचा रक्तदाब कमी होण्यास मदत होते. याशिवाय जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे कॅलरी कमी होऊ शकतात.

तसेच, गरम पाणी रक्तदाब नियंत्रित करण्यास, त्वचेची चमक वाढविण्यास, पचनास मदत करण्यास, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास आणि मासिक पाळीशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत करते.

किती पाणी प्यावे?

डॉ.भारद्वाज म्हणाले, 'जर तुम्हाला हे सर्व फायदे मिळवायचे असतील तर दिवसभरात किमान पाच ग्लास गरम पाणी प्या. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या नवीनतम मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दररोज 8 ग्लास पाणी पिण्याने शरीर हायड्रेटेड आणि संतुलित राहते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT