b-12 vitamin sakal
आरोग्य

शरीरशास्त्र : ‘बी-१२’च्या जीवनसत्त्वाचा प्रभाव

डाॅ. अजय कोठारी

‘डॉक्टर मला फार थकल्यासारखे वाटत आहे. कशातच उत्साह वाटत नाही,’ अशी समस्या ऐकल्यास नक्की जाणवते संबंधित रुग्णामध्ये ‘बी-१२’ या जीवनसत्त्वाची कमतरता असू शकते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी व प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे जीवनसत्त्व उपयुक्त आहे.

‘बी-१२’च्या कमतरतेची लक्षणे...

  • प्रचंड थकवा, शिथिलता.

  • हाता-पायाला मुंग्या येणे, बधीरपणा जाणवणे.

  • शरीरातील रक्त कमी होणे.

  • हृदयविकारची शक्यता वाढते.

  • विस्मरण होणे, तोल जाणे.

  • तोंडात व्रण/छाले येणे

‘बी-१२’ची कमतरता कोणाला जाणवू शकते?

आहारात ‘बी १२’चे प्रमाण कमी असणे.

नेहमी पित्ताचा त्रास असणारे पित्तनाशक औषधे घेत असतात, तसेच आतड्याचे विकार असणाऱ्यांमध्ये या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते.

‘बी-१२’ कोणत्या आहारातून मिळते?

शाकाहारी - दूध व दुग्धजन्य पदार्थ, कडधान्य, सुकामेवा (अक्रोड, सुके अंजीर, काळे मनुके, जर्दाळू), सोया दूध, डाळी.

मांसाहारी - मांस, अंडी, चिकन

‘बी-१२’च्या कमतरता कसे निदान करावे?

१) वरील लक्षणे असल्यास रक्ततपासणी करणे. ‘बी-१२’चे प्रमाण - १९०-९५० Pg/ml (नॉर्मल)

  • उपाशीपोटी तपासण्याची गरज नाही.

  • ही नॉर्मल रेंज फार मोठी आहे, त्यामुळे साधारणत- ३०० Pg/ml व जास्त ही नॉर्मल समजली जाते.

  • १९०च्या खाली असल्यास कमतरता असते.

  • २००-३०० - बॉर्डर लाइन

  • त्याचबरोबर CBC व Folate हे सुद्धा तपासणे काही लोकांमध्ये गरजेचे असते.

(‘बी-१२’ पाण्यात मिसळणारे जीवनसत्त्व आहे. त्यामुळे त्यामध्ये अतिरिक्त डोसची लक्षणे कमी बघायला मिळतात. तरीही डोकेदुखी, उलटी, मळमळ, जुलाब हे त्याच्या अतिरिक्त डोसची लक्षणे आहेत.)

‘बी-१२’ कमी झाल्यास उपचार -

  • ‘बी-१२’ इंजेक्शन हे प्रभावी आहे. शरीरातील प्रमाण वाढविण्यास मदत होते. इंजेक्शन घेण्यापूर्वी ॲलर्जी तपासणी करणे गरजेचे आहे.

  • ‘बी-१२’च्या गोळ्याही उपलब्ध आहेत.

- आजकाल नाकाद्वारे ‘बी-१२’चे स्प्रे सुद्धा उपलब्ध आहेत.

(लेखक संचेती हॉस्पिटलमध्ये मणका तज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MVA Seat Sharing: विधानसभेत रंगत! महाविकास आघाडीकडे मागितली स्वतंत्र लढण्याची परवानगी, कोणत्या पक्षाने केलं शक्ती प्रदर्शन?

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; देशांतर्गत शेअर बाजार कसा असेल?

Maharashtra Politics: निवडणुकीनंतर होणार प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ; सातवड यात्रेतील होईकाची भविष्यवाणी नेमकी काय?

Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' बंद केली, शेतकरी सन्मान, पीएम आवासही थांबणार आहे का? माजी मुख्यमंत्र्यांचा सवाल

Latest Maharashtra News Updates : पोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन, मुख्यमंत्री शिंदेंनी पोलीस जवानांना वाहिली आदरांजली

SCROLL FOR NEXT