योग हा एक प्रकारचा व्यायाम आहे ज्यामध्ये मन आणि शरीर या दोन्हींचा समावेश होतो. स्नायूंच्या हालचालींचे संयोजन वापरून श्वास आणि उर्जेसह जागरूकतेच्या विविध पैलूंवर आंतरिकपणे लक्ष केंद्रित केले जाते.
योग हा एक प्रकारचा व्यायाम आहे ज्यामध्ये मन आणि शरीर या दोन्हींचा समावेश होतो. स्नायूंच्या हालचालींचे संयोजन वापरून श्वास आणि उर्जेसह जागरूकतेच्या विविध पैलूंवर आंतरिकपणे लक्ष केंद्रित केले जाते. पाठदुखी, मणक्याशी संबंधित समस्या टाळण्यासाठी योगासन फायदेशीर आहे. योगासने आणि प्राणायामामुळे तुमचे स्नायू बळकट होऊन त्यात लवचिकता येते. त्यामुळे स्नायूंचा ताण कमी होतो.
मणक्याच्या समस्या टाळण्यात योगासनाची मदत
स्नायूंना आराम मिळतो आणि ताणून त्याची लवचिकता वाढवली जाते
योगामध्ये विविध आसनांचा समावेश होतो.
प्रत्येक आसनस्थिती १० ते ६० सेकंदांसाठी धरली जाते. असे केल्याने ज्या स्नायूंमध्ये ताण निर्माण झालेला आहे तो कमी होण्यास मदत होते आणि त्याची लवचिकता वाढते. आसनांमध्ये काही स्नायू घट्ट तर काही स्नायू ताणले जातात.
स्नायूंची लवचिकता हा मौल्यवान घटक आहे. चांगल्या प्रकारे लवचिकता असलेल्या स्नायूंमध्ये दुखापत होण्याची शक्यता कमी असते. कमी लवचिक स्नायूंना खूप जास्त ताण येऊन त्यांना इजा होण्याची शक्यता असते. पाठीच्या खालच्या भागात दुखत असलेल्या लोकांसाठी, स्ट्रेचिंग खूप महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, हॅमस्ट्रिंग स्नायू (मांडीच्या मागील बाजूस) ताणल्याने ओटीपोटात गती वाढण्यास मदत होते, पाठीच्या खालच्या भागावरील ताण कमी होतो.
स्नायूंची हालचाल वाढवणे
आपली दैनंदिन व्यग्र जीवनशैली आणि कामाचा बोजा यामुळे स्नायूची काम करण्याची मर्यादा येऊन शरीराची हालचाल कमी होण्याची शक्यता आहे. या जीवनशैलीमुळे पाठदुखी आणि पाठीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. योगासने केल्याने घट्ट झालेले स्नायू मोकळे होतात. त्यामुळे शरीराची हालचाल सुधारते आणि वेदना कमी होतात. पाठीचे आणि ओटीपोटाचे स्नायू हे मणक्याचे आवश्यक स्नायू आहेत. ते शरीराला योग्य सरळ स्थिती आणि हालचाल राखण्यास मदत करतात. हे स्नायू व्यवस्थित असतात तेव्हा पाठदुखी कमी होते किंवा टाळता येते.
मणक्याभोवतीच्या स्नायूंची ताकद
काही योगासनांमध्ये मणक्याच्या पुढील बाजूला असणारे स्नायू हे मणक्याच्या दिशेने घट्ट करून पाठीचा कणा मजबूत ठेवण्यासाठी मदत होते. मणक्याच्या तटस्थपणा वाढवण्यास मदत करणे, पोक वाढलेले असणे, लांबलचक पुढे किंवा मागे वाकणे हे पाठीसाठी हानिकारक असू शकते. पाठीचा कणा तटस्थ असल्यास पाठीशी संबंधित समस्या टाळल्या जाऊ शकतात. नियमितपणे योगाभ्यास केल्याने तुमचे डोके, खांदे व्यवस्थित ठेवले जातात. शरीराची हालचाल आणि त्यासाठी आवश्यक असणारे स्नायूंचे संतुलन सुधारण्यास मदत होते.
रक्तप्रवाह सुधारतो
योगासनाची प्रत्येक मुद्रा खोल आणि लयबद्ध श्वासावर लक्ष केंद्रित करते. हे श्वासोच्छवासाचे तंत्र संपूर्ण शरीराला आराम देण्यास मदत करते आणि संपूर्ण शरीरात रक्त प्रवाह वाढवते. सुधारित रक्तप्रवाहामुळे शरीराला पोषण मिळते. त्यामुळे पाठीच्या स्नायूंच्या सभोवतालची रचना सुधारण्यास मदत होते.
तणाव कमी करणे
योगासनाचे फायदे हे स्नायूंसोबतच शरीराच्या अन्य प्रणालींना होतात. योग्य श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित केल्याने शरीराच्या हालचाली तालबद्ध होऊन तणाव कमी होतो. मानसशास्त्रीय आणि भावनिक घटक वेदनांच्या संवेदनावर प्रभाव टाकतात आणि उच्च तणावामुळे पाठदुखी होऊ शकते. योगासनांमुळे चिंता आणि नैराश्य कमी होते.
(लेखक संचेती हॉस्पिटलमध्ये मणकातज्ज्ञ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.