हाडांच्या व स्नायुंसाठी बळकटीसाठी तरुणांना प्रोटिन पावडर घेण्याची आवश्यकता असते, असा समज आहे. प्रत्यक्षात त्याची गरज नाही. तरुणांनी चांगला आहार घेऊन त्याद्वारे प्रोटिन घेतले पाहिजे. त्यासाठी अतिरिक्त सप्लिमेंटरी अन्न घटक घेतल्यास किडनीवर परिणाम होतो. त्यातून युरिक अॅसिड वाढते ते शरीरासाठी उपयुक्त नाही. वृद्ध लोकांना भूक लागत नाही. आहार कमी आहे, पचनक्रिया कमकुवत आहे, त्यांना संतुलित मात्रेत सप्लिमेंटरी फूडची आवश्यकता असते.
वयोवृद्ध लोकांना मणक्याचे काही आजार झाल्यास त्यावर काही उपचार नसतो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता वयाच्या साठी किंवा सत्तरीनंतर मणक्याचे आजार बरे होऊ शकतात. यामध्ये व्यायाम, बेल्ट सपोर्ट हे पहिले उपचार शस्त्र आहे. याद्वारे बरे न झाल्यास पेन मॅनेजमेंट इंजेक्शन घ्यावी लागतात.
स्लेक्टिव्ह नेव्हर रूट ब्लॉक
फॅसेट ब्लॉक
रेडिओ फ्रिक्व्हेन्सी
इपिड्यूरल
अशी आधुनिक विना ऑपरेशन पद्धती आहे. त्यामुळे मणक्याचा त्रास कमी होऊ शकतो. शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे व छोट्या छिद्रातून होणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे वृद्धांना बरे वाटू शकते. व आनंदी जीवन जगू शकतात.
अॅलोपॅथीची औषधे हानिकारक असू शकतात, असा अनेक जणांचा गैरसमज असतो. अॅलोपॅथी औषधामुळे साइड इफेक्ट होऊ शकतात, असाही गैरसमज असतो. परंतु अॅलोपॅथीची औषधे प्रभावी असतात. त्यामुळे लगेचच गुण येतो. इमर्जन्सीच्या काळात ही औषधे वरदान आहेत. यावर आता खूप संशोधन सुरू आहे. अॅलोपॅथी आणि होमिओपॅथी किंवा अॅलोपॅथी आणि आयुर्वेद ही औषधे एकत्र आल्यास अधिक प्रभावी उपचार होऊ शकतात.
व्यायामशास्त्राचे शरीराच्या मजबुतीसाठी वेगळे महत्त्व आहे. आपल्या प्रत्येक अवयवाची कोणती काळजी घ्यायची कोणते व्यायाम शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि किती वेळा करावेत याची माहिती यामध्ये दिलेली असते. त्यामुळे आपण निरोगी जीवन जगू शकतो. तंबाखू, दारू, सिगारेट याचे हाडांवर आणि मणक्यावर दुष्परिणाम होतात. सिगारेट व तंबाखूमध्ये निकोटिन असते. या दोन्हीबरोबर दारूमुळे हाडे ठिसूळ होऊन त्यातील पोषण कमी होते. त्यामुळे कमी वयात हाडांमध्ये ठिसुळता आणि मणक्याचे आजार उद्भवतात.
जास्त वजन स्पाइन व हाडांसाठी धोकादायक आहे. बॉडी मास इंडेक्स म्हणजे तुमचे वय, उंचीप्रमाणे तुमचे वजन असले पाहिजे. याची एक सूची आहे. वजन जास्त असल्यास मणक्याची झीज, स्लीप डिस्क होऊ शकते. कमी वयात सांध्याचे दुखणे उद्भवू शकते. शरीराचे योग्य वजन राखणे हे मणक्याच्या आजारावर मात करण्याचे पहिले शस्त्र आहे.
(लेखक संचेती हॉस्पिटलमध्ये मणका तज्ज्ञ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.